आधारच्या शैक्षणिक मदतीने प्रतीकला मिळाले बळ..
समाजसेवक विठ्ठल वाव्हळ यांची ४० हजाराची मदत
संगमनेर / लोकवेध live न्यूज
प्रतीक भाऊसाहेब जोंधळे राहणार धांदरफळ तालुका संगमनेर हा विद्यार्थी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या ठिकाणी बी कॉम्प्युटरच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
त्याच्या वडिलांचे 2012 या वर्षी निधन झाले. त्याची बहीण इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते.दरवर्षी 60 ते 62 हजार इंजिनिअरिंगची प्रवेश फी ते भरू शकत नव्हते. त्यामुळे आधार फाउंडेशन तर्फे शैक्षणिक दत्तक पालक योजनेतून विठ्ठल वाव्हळ यांच्या सहकार्याने प्रतीकला मोठी आर्थिक मदत झाली.
आधार समन्वयक पी डी सोनवणे यांनी पाठ पुरावा करत परिस्थिती समजावून घेतली. दुसरा कुठलाच मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नसल्याने जास्त फीज द्यावी असा आग्रह धरला.
आधार अनेक सेवाभावी मित्रांच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत मदत करत आहे. त्यामुळे आर्थिक बजेटमुळे मोठी रक्कम देणे आधारलाही शक्य नव्हते.
प्रतीक जोंधळे याची अडचण आधार समन्वयक सोमनाथ मदने सुखदेव इल्हे,विठ्ठल कडुसकर यांनी आधार संस्थेचे ज्येष्ठ शिलेदार विठ्ठल वावळ यांना सांगितली.
त्यांनी प्रतिकची संपूर्ण परिस्थिती समजून घेत चाळीस हजार रुपयाची मदत आधार संस्थेच्या माध्यमातून प्रतिक जोंधळे यास केली.
नुकतेच आधार फाउंडेशनच्या मासिक मिटिंगमध्ये संगमनेरचे दुय्यम निबंधक पालवे साहेब यांच्या हस्ते आधार फाउंडेशनच्या इतर सभासदांच्या उपस्थितीत चेक देण्यात आला.
इंजीनियरिंगचे मागील तीनही वर्षात प्रतिक फर्स्ट क्लासने उत्तीर्ण असून आधारच्या मोठ्या मदतीने त्याचे इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
