९ ऑगस्ट पासून अगस्ती आश्रम येथे अधिकमास निमित्ताने महिनाभर अखंड हरीनाम स्मरण

 

अकोले /लोकवेध live न्यूज 

 

अगस्ती आश्रम येथे अधिकमास निमित्ताने महिनाभर आयोजित अखंड हरीनाम स्मरण कार्यक्रमात ह.भ.प. दिलीपजी महाजन यांची हनुमान कथा चे आयोजन आज ( ९ऑगस्ट) पासून करण्यात आले आहे अशी माहिती अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड के.डी.धुमाळ यांनी दिली.
अगस्ती ऋषी आश्रमात अधिक मास निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे. कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, अगस्ती महात्मे पारायण, श्रीमद् भगवद्गीता पारायण तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केलेले आहे.
उद्या पासून दुपारी ४ वा हभप दिलीपजी महाजन हे हनुमान कथा चार दिवस सांगणार असून आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे निरूपण करणार आहे. डॉ.अनिल सहस्रबुद्धे सर हे १६ ऑगस्ट रोजी प्रवरा आवतरण याचेवर निरूपण करणार आहेत.
हभप उद्धव महाराज मंडलिक, राजेंद्र महाराज नवले, धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख, माधवदास महाराज राठी, मनोहर महाराज भोर, रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर, मृदूंगाचार्य अशोक महाराज पांचाळ यांचे सायंकाळी ७ वा हरिकीर्तन होणार आहे.
१८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. हभप जगदीश महाराज जोशी, त्रंबकेश्वर यांचे काल्याचे कीर्तन होईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप मनोहर महाराज भोर, दिपक महाराज देशमुख, किसनशेठ लहामगे, सु. गं. शालिग्राम, बद्रीशेठ मुंदडा, रामनाथ मुतडक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!