गगनगिरी महाराज सप्ताहास साधू संतांच्या उपस्थिती आणि ग्रंथपूजनाने प्रारंभ
थोर साधू संतांची उपस्थिती
पिंपरणे / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ता हाचा शुभारंभ संत मिरवणूक आणि घट स्थापनेने झाला श्रीक्षेत्र खोपोली येथून आणलेल्या स्वामी गगनगिरी महाराजां च्या मूर्तीची सप्ताहस्थळी मंत्रोपचारात मूर्तीची प्रतिष्ठापना महाआरती करण्यात आली

संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे ९ ऑगस्ट ते१६ऑगस्ट या कालावधी मध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह (पर्व ७ वे) सुरू होत आहे जाखोरी गावचे ग्रामदैवत अस णाऱ्या जाखुआईदेवी मंदिरा पासून डीजेच्यासुमधुर आवाजात सकाळी ११ वाजेच्या सुमारास भगव्या साड्या परिधान केलेल्या कलश व तुळसधारी महिला डोक्यावरती तुळस आणि कलश घेऊन या मिरवणुकीत सह भागी झाल्या होत्या संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली होती या मिरवणुकीत लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तरुणींपासून ते ज्येष्ठ महि लांपर्यंत अबाल वृद्ध सर्वच मिरवणुकीत गगनगिरी महाराजांचा जयजयकार करत होते या मिरवणुकीत सजवलेले घोडेगाडी मध्ये तसेच रथामध्ये साधुसंत विराजमान झाले होते आणि एका रथा मध्ये श्रीक्षेत्र खोपोली येथून आणलेली स्वामी गगनगिरी महाराजांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती साक्षात गगनगिरी महाराजच या रथामध्ये बसलेले असल्याचा अनेकांना भास झाला होता गगनगिरी महाराजांचे नातू शिवाजी पाटणकर मुंबईतील मनोरी आश्रमाचे निषाद पाटणकर,यांच्या हस्ते शिवपुराण कथेचे पूजन करत नाशिकचे शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांचा सत्कार करण्यात आला तर चंद्रालेखाताई महाराज काकडे यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली

सप्ताहस्थळी आली त्यावेळी अनेक महिलांनी आणि पुरुषांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला तसेच सप्ताहस्थळाच्या प्रवेशद्वारातून गगनगिरी महाराजांच्या मूर्तीचा रथ आतप्रवेश करत असताना जीसीपीने महाराजांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर गगन बावडा आश्रमाचे बालगिरी महाराज सोनगिरीमहाराज बबन महाराज सोनवणे, द्वारकादास महाराज गुजरात, सुभाष महाराज रोडे, काशिनाथ महाराज आहेर, सयाजी महाराज आनंदगिरी महाराज बुवाजी बाबा पुणेकर संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख व्हा चेअरमन राजेंद्र चकोर यांच्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे संजय महाराज देशमुख यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली यावेळी किरण महाराज शेटे अशोकराव कोकणे दादासाहेब वर्पे कपिल पवार बाळासाहेब ताजने संजय पुंड शेखर गाडे राजेंद्र देशमुख विठ्ठलदास आसावा विलास कवडे, रवी रोहम, विक्रम थोरात, संतोष मांडेकर बाळासाहेब देशमुख किसन पानसरे राजेंद्र देशमुख राजेंद्र पानसरे नितीन पानसरे कारभारी राहणे सागर पानसरे आदी उपस्थित होते
चौकट
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे सुरू असणाऱ्या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह निमित्त यावर्षी प्रथमच नाशिक येथील माधवदास महा राज राठी यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव पुराण महाकथा श्रावण करण्याची संधी
परिसरातील भाविक भक्तांना मिळाली आहे कथेच्या पहिल्या दिवसाला परिस रातील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उप स्थिती दर्शवली होती
