दया,क्षमा,शांती ज्याचे जवळ असते तोच खरा संत :- नवले महाराज
अकोले / लोक वेध live न्यूज
संत ओळखांचे लक्षण असतात. बाह्य रूपापेक्षा अंतर रंगाने ते कळतात, दया, क्षमा, शांती बाळगणारा खरा संत असतो असे मत अगस्ती देवस्थान ट्रस्ट पायी दिंडी सोहळा चे प्रमुख ह.भ.प. राजेंद्र महाराज नवले यांनी व्यक्त केले.
अगस्ती आश्रम अकोले येथे अधिकमास निमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सोहळ्यात कीर्तन पुष्प गुफतांना
संत तोचि जाना जगी ।
दया क्षमा ज्याचे अंगी ||
ताटी या प्रकरणातील मुक्ताबाई यांच्या अभंगावर नवले महाराज निरूपण करताना बोलत होते. याप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक गुरुवर्य डॉ अनिल सहस्त्रबुद्धे सर, अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ किरण लहामटे, देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अड के.डी.धुमाळ, मनोहर महाराज भोर, दीपक महाराज देशमुख, गणेश महाराज वाकचौरे पांडुरंग महाराज फरगडे आदी उपस्थित होते
हभप नवले महाराज बोलताना म्हणाले की, आदिशक्ती मुक्ताबाईंचा अधिकार मोठा होता. आईसाहेबांनी केलेला बोध आहे. अज्ञानाला बोध करणे सोपे असतं परंतु ज्ञान्याला शुद्धी वरती आणणे अवघड असते ज्ञानाला शुद्धीवरती आणण्याचे काम आदिशक्ती मुक्ताबाई यांनी केलं. संत नामदेव महाराज, योगीराज चांगदेव महाराज व संत ज्ञानोबाराय यांना बोध करण्याचं काम मुक्ताबाई यांनी केलं असं गोड चिंतन महाराजांनी मांडल. सव्वा महिन्याच्या भक्ती उत्सवामध्ये हजारोच्या संख्येने भाविक दररोज किर्तन श्रवणासाठी येतात यावेळी अन्नप्रसादाची सेवा समस्त ग्रामस्थ माळीझाप यांच्या वतिने संपन्न झाली याप्रसंगी चंद्रकांत महाराज चौधरी विशाल महाराज वाघमारे इंद्रभान कोल्हाळ सर नितीन महाराज देशमुख संदीप महाराज सावंत ज्ञानेश्वर महाराज नाईकवाडी रोहित महाराज राक्षे दीपक महाराज साबळे काशिनाथ म्हशाळ पोपट दिवटे साहेबराव घुले या भजनी मंडळीनी संगीत साथ दिली.
