कुटूंबातील सर्वांनी एकत्र येत भगवंताची आराधना करा – राठी
गगनगिरी महाराज सप्ताहात शिवपुराण कथाकार मधवादास महाराज राठी यांनी दिला श्रोत्यांना सल्ला
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आजकाल समाजात कर्तव्यप्राप्तीची कुणालाही जाणीवच राहिलेली नाही त्या मुळे हा सगळ्याचा परिणाम वाईट होत आहे म्हणून घरातील सर्वांनी दिवसातून एक वेळ न चुकता भगवंतांचे चिंतन केले तर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे दिवसातून एकवेळ ठरवून सर्वांनी एकत्र येऊन भगवंताची आराधना करत पाच मिनिटे चिंतन करावे असा मोलाचा सल्ला नाशिकचे शिवपुरान कथाकार माधवदास महाराज राठी यांनी केले
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे चौथे पुष्प गुंफ ताना माधवदास महाराज राठी बोलत होते यावेळी किल्ले गगनगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट विशवस्त रमेशराव माने गोविंदराव माने मारोतीराव माने लक्ष्मण माने किसन बनकर पोराईट कंपनीचे कार्यकारीसंचालक संदीप फटांगरे बिपीन देशमुख सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप राव शिंदे संजय महाराज देशमुख बाळू महाराज आबासाहेब थोरात कपिल पवार नवनाथ आगलावे विठ्ठलदास असावा बाळासाहेब देशमुख किसन पानसरे देशमुख नितीन पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते
राठी म्हणाले की सांसार हा विश्वासा वर अवलंबून असतो पती-पत्नी या उभ यतांमध्ये जर विश्वास नसेल तर एकमेकां वर केलेल्या कृतीबद्दल विश्वास राहणार नाही तो विश्वास परस्परांनी टिकवायचा असतो जर असे होत नसेल तर तो व्यव हार आणि तो संसार कधीच टिकत नाही आपली पती ज्ञानी आहेत त्यांच्याजवळ प्रत्यक्ष ज्ञान आहेत कल्याण स्वरूपामध्ये आहे ते जे काही करतात ते उत्तमच करत आहे त्यावर विश्वास ठेवा जास्त चिकित्सा करत बसू नका असा सल्ला राठीमहाराज यांनी भाविक भक्तांना दिला
संध्याकाळच्या वेळेत बहुतेक वेळा आम्ही टीव्ही पाहण्यातच घालवत असतो कधी आपल्या मुलांना सोबत घेऊन त्यां च्यावर संस्कार करतात का याचा विचार समाजाने करणे काळाची गरज आहे जे आज समाजात चित्र निर्माण झालेआहे ते विचित्र असणारे चित्र बदलण्यासाठी भग वंतांची आराधना करणे आवश्यक आहे घरातील सर्वांनी दिवसातील कोणत्याही एका वेळेस रोज नियमपूर्वक एकत्र येऊन पाच मिनिट का होईना भगवंतांची आराधना करा असा सल्ला देत तेम्हणाले की संस्कार आमच्यावरती राहिलेले नाही जर असे झाले नाही तर पुढील३० वर्षांनी मंदिरे बांधण्याची गरज राहणार नाहीया गंभीर गोष्टीचा विचार करण्याची आवश्य कता आहे विचाराच्या नादाला लागून आम्ही आमचा परिवार आमची कुटुंब व्यवस्था निर्माण केली पाहिजे
पूर्वीच्या काळी पाच सहा भाऊ चार पाच बहिणी होत्या हळूहळूतोविषयआता संपत चालला आहे आता हम दो हमारे दो तेही संपलंआहे तर आता हम दोहमरा हमारा एक ते ही आता संपायला लागले आहे आता काय ज्याच्याबरोबर राहायचं आहे ज्याला वाटेल त्याच्याबरोबर जायचं जितक्या दिवस राहायचे तितक्या दिवस राहायचं म्हणजे “लिव्ह इन” राहत आहे याचा अर्थ शरीर हे फक्त भोगासाठी आहे की काय याचा विचार करणे गरजेचेआहे सध्या या पाश्चात्य आणि राक्षसी जीवन जगणाऱ्यां संस्कृतीचा विचार करणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज निर्माण झाली आहे सध्याच्या काळात भाव भाव नांना अस्तित्वच राहिलेले नाही अनेक चांगले निर्णय करण्याकरिता सर्वच्च न्या लयाला 70 -70 वर्षे लागतात आणि समलैंगिक विवाहला मान्यता द्यावी या करता याचिका दाखल करून घाईघाईने त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला पुरुषच पुरुषाबरोबर असतील विवाह करून जायचं पुढे काय कशासाठी त्यां च्याकडे हा विचार होईल की नाही याचे काहीही सांगता येत नाही जे सनातन धर्माचे परिपालन करतात त्यांच्या बाब तीत बुद्धीभद करण्याचा प्रयत्नकरतआहे आमचे नाते संपत चालले आहे अजून३० वर्षानंतर नातेही संपलेले असेल आम्ही आमच्या कुटुंबव्यवस्थेला सांभाळले नाही आम्ही आमच्या विचाराची व्याप्ती व्यापकता वाढवली पाहिजे अरेआपल्या भावाची मुले ४दिवस आमच्याकडे आली तर आमच्या डोक्याला आठ्या पडतात असा विचित्र चित्र पहावयास मिळत आहे कोणी एकमेकांना सांभाळायला तयार नाही ही आमची मनोभूमिका फार वाईट झाले आहे जिथे आत्मीय संबंध राहिला नाही तो समाज किंवा राष्ट्र कधीच उभे राहुच शकत नाही अशी भीती त्यांनीव्यक्त करत ते म्हणाले की प्रत्येक घरातील वडी लधाऱ्यांचे किंवा कुटुंबप्रमुखांचे दायित्व आहे ते आज किती कुटुंबात स्वीकारले जाते हा एक मोठा संशोधनाचा विषय झाला असल्याचे त्यांनी सांगितले
नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर गेलेले पुन्हा परत गावाकडे यायचा कोणी विचारच करत नाही आले तर ते आप ल्याला अक्कल शिकवायला येतअसतात आणि आपला हिस्सा गुंडाळून घ्यायला येतात बाकीत्यांना कशाचेही घेणे देणे ही नसते आपण एकदाही आमच्या कपाळी गंध लावायचं म्हटलं तर आम्हाला लाज वाटते थोडा विचार करा कधी ही आम्ही आमच्या जीवनात कधीच गोसेवा केली नाही गाईला पशु समजून उत्पन्नाचे साधन आणि समजलो आमची शेती बिघडली आहे सद्गगुरूगगनगिरी महाराजांनीअनेक लोक घडवलेआहेत त्या भगवंतांची उपा सना आणि साधना केलीच पाहिजे किती वर्षांनंतर खऱ्या अर्थाने किती जणांना गग नगिरी महाराज कळाले याचा प्रत्येकाने विचार करावा असा सल्ला त्यानी दिला
घरातील रोज सगळ्यांनी एका वेळेस एकत्र येऊन जेवणाची वेळ एक ठेवा सगळ्यांनी त्यावेळेस एकत्र येऊन एका ठिकाणी बसून हसत खेळत आनंदाने जेवण करा यातून परस्परांचे असणारे एकमेकांविषयीचे सदभाव अधिक वाढत जातील आणि या मोबाईलचा आमच्यावर एवढा परिणाम झाला की आम्ही कुठल्या दिशेला चाललो आहे हेआम्हालाहीसांगता येत नाही त्यामुळे मोबाईलचा वापर किती करायचा हे प्रत्येकाने ठरवावे असा सल्ला देत ते म्हणाले कीभागवत रामायण आशा कथा कायम होत असतात मात्र शिवकथा लवकर होत नाही स्वतः भगवान शिवांना सांगितलेली कथा जी आहे ती लवकरच श्रवणाचा योग येत नाही त्यामुळे प्रत्येक श्रोत्याने शिवपुराण कथा ऐकण्याची सुवर्णसंधी दवडू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला
चौमान्य
महिलांनी एखादे काम मागे राहिले तरी तरी चालेल मात्र आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार करा सासू सासऱ्यांसह सर्वांनी आपुलकीचे नाते जपा प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करा आपण पावसाळ्यात झाडे लावतो उन्हाळ्यात ते जळून जातात या सप्ताहातून पर्यावरण याचा संदेश द्या आपल्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी झाडे लावा आणि ते झाडे जगवा प्रत्येकाने कुणाचाही आदर्श घ्या अगर नका घ्या मात्र आईवडिलांचा आदर्श घ्या असा सल्ला समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यांनी दिला
photo
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणाऱ्या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथा पूजन करताना गगनगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट विशवस्त रमेशराव माने गोविंदराव माने मारोतीराव माने पोराईट कंपनीचे कार्यकारी संचालक संदीप फटांगरे बिपीन देशमुख छाया संतोष पानसरे जाखुरी
