खरशिंदे येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्यातील वरवंडी केंद्र अंतर्गत खरशिंदे शाळेत अतिशय सुंदर अशा कवायत व विद्यार्थ्यांचे पहिली ते पाचवी पर्यंत सुंदर अशी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे ऐकण्यास मिळाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय पोपळघट व प्रमुख पाहुणे प्रथम नागरिक सरपंच श्रीम.सविताताई वाडेकर, उपसरपंच श्री. अशोक बर्डे व श्री. भैय्या इनामदार उपस्थित होते. यावेळी नवीनच रुजू झालेले शाळेत मुख्याध्यापक श्री.गागरे सर व श्री. गावडे सर व श्रीम.माने मॅडम यांनी अतिशय नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला. सरांनी गावात प्रभात फेरी काढून जय जवान जय किसान यासारखे नारे देत ढोल च्या आवाजात पूर्ण गाव असे दुमदुमले. या लहानशा छोट्या मुलांनी एवढे मोठे धाडस दाखवून आपल्या भाषणातून गावाविषयी व देशाविषयी असलेले प्रेम त्यांनी दाखवून दिले. खरं म्हणायचं ठरलं तर आपण बघतो घरामध्ये एक दोन मुलं असतात तरीपण आपल्याला किती त्रास होतो. परंतु हे शिक्षक किती मुलांना आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे किती प्रेमाने घडवतात हे आज 15 ऑगस्ट निमित्त गावातील सर्व नागरिकांना पाहायला मिळाले. यावेळी मागच्या वर्षीचे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आले, त्यांचे कौतुक करून एक छोटासा सत्कारही यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच सविता वाडेकर, उपसरपंच अशोक बर्डे व सदस्य यांनी शिक्षकांचे आणि मुलांचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थ माजी सरपंच राजेंद्र भुसारी यांनी शिक्षकांचे आभार मानले. खरशिंदे गाव अतिशय डोंगर भागात असल्यामुळे येथे नवीन शिक्षक येताना खूप विचारपूर्वक येतात परंतु येथे आल्यानंतर गावातील वातावरण व गावातील लोकांचं सहकार्य बघून शिक्षक सुद्धा अतिशय श्रम घेऊन मुलांना कसं दर्जेदार शिक्षण देता येईल हे बघत असतात आणि या गावातील मुलं जास्तीत जास्त नोकरीत कसे लागतील असा त्यांचा निश्चय असतो खरशिंदे गावात जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे गावाच्या सहकार्यामुळे शाळा डिजिटल ,आय. एस. ओ. मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामध्ये आता शाळा केंद्रात नव्हे तर तालुक्यात प्रथम क्रमांकावर कसे आणता येईल हे मुख्याध्यापक श्री. गागरे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त करताना सांगितले व शाळेतील सध्याची उपस्थिती 95 टक्केच्या वरती असून ती शंभर टक्के कशी राहील यासाठी आम्ही तीनही शिक्षक प्रयत्नशील राहू , असे ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शासन परिपत्रकानुसार माता पालक गटाची निपुण प्रतीज्ञा व लीडर माता पालकांचा सत्कार, तंबाखू मुक्त प्रतिज्ञा व आरोग्य विषयक क्षयरोग मुक्ती प्रतिज्ञा घेण्यात आली. गावातील तरुण तडफदार सोनू उर्फ सत्यजित वाडेकर तन, मन, व धनाने गाव व शाळेसाठी अतिशय उत्साहाने सतत कार्य करत असतो. त्याचे श्री. भैय्या इनामदार यांनी विशेष आभार मानले .
अशा पध्दतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
