महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून निमगाव जाळी ग्रामपंचायतीस ई.रिक्षा प्रदान

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

 

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनी निमगाव जाळी तालुका संगमनेर या ग्रामपंचायती साठी घराघरांतून घन कचरा संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून ई-रिक्षा देण्यात आली आहे.ई- रिक्षाचे निमगाव जाळी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर आगमन होते वेळी विधीवत पूजन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मा.श्री.शिवाजीराव जोंधळे साहेब यांचे हस्ते करण्यात आले .याप्रसंगी निमगाव जाळी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे,ग्रा.पं.सदस्य सुरेश डेंगळे,ग्रा.पं.सदस्य दिलीपराव डेंगळे,ग्रा.पं.सदस्य वैभव वदक,ग्रा.पं.सदस्या सौ.साक्षीताई जोंधळे,ग्रा.पं.सदस्या सौ.मंदाताई अरगडे,ग्रा.पं.सदस्या सौ.कमलताई थेटे,सौ.आशाताई रसाळ,मा.सरपंच अमोल जोंधळे, श्री.हेमंतशेठ तांदळे, श्री.नंदू डेंगळे, श्री.लंगोटे सर, श्री.बबलू डेंगळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!