मंगेश कडलग यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

क्रांतिकारी व पुरोगामी विचाराचा व सौ.शहरी,एक संगमनेरी ही ऊक्ती सिद्ध करणाऱ्या संगमनेरच्या जवळे कडलग ही जन्मभूमी लाभलेल्या व थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कॉम्रेड पी.बी.कडू पाटील यांच्या कार्यांने पुनीत झालेल्या सात्रळ ता.राहुरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या
विद्यालयातील उपक्रमशील,
गुणवंत आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक मंगेश गुलाबराव कडलग यांना महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स,नरिमन पॉइंट,मुंबई येथे शिक्षक दिनी भव्य दिव्य सोहळ्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मा. आ.कपिल पाटील,कौशल्य विकास विभाग तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मंगेश कडग यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या सात्रळ ता-राहुरी येथील कडू पाटील रयत संकुलातील कन्या विद्यालयात,माध्यमिक विभागात काम करत असताना केलेल्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला
मंगेश कडलग हे गेली 21 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असून. ते सेट (राज्यस्तरीय पात्रता परीक्षा),नेट(राष्टीय पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असून ज्ञानरचनावाद या विषयावर त्यांचे पीएच. डी संशोधन कार्य सुरू आहे. मागील वर्षी मंगेश कडलग हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण,मुंबई यांचे मार्फत देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शरद पवार इंस्पायर फेलोशिप साठी ते पात्र ठरले होते.
मंगेश कडलग यांच्या यशाबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील, रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, विधानपरिषद सदस्य माजी आमदार डॉ.सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे,रयत चे उत्तर विभागीय अधिकारी मा. तुकाराम कण्हेरकर , सहाय्यक विभागीय अधिकारी मा. काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर, प्राचार्य राजेंद्र बढे,मुख्याध्यापिका सौ. अनिता निबे, पर्यवेक्षिका सुशीलाताई थोरात, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.विजयराव कडू पा., संभाजीराव चोरमुंगे पा. बबनराव कडु पा ,पत्रकार किशोर भांड माजी सरपंच गणेश पाटील कडू भास्करराव फणसे, शांतीभाऊ गांधी,डॉ. के के बोरा ,सौ मंगलाताई चोरमुंगे, लीलाताई बोरा,युवा नेते किरण पाटील कडू ,पंकज पाटील कडू ,विक्रांत पाटील कडू,रयत सेवक संघाचे मा.सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर सर्व स्कुल कमिटी सदस्य, पालक ,ग्रामस्थ आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!