अ.नगर मध्ये उभे राहणार विश्वकर्मा साहित्य ज्ञान मंदिर ;
विश्वकर्मा पूजन दिनी युवकांनी घेतला हाती उपक्रम
अ. नगर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विश्वकर्मा पांचाळ समाज घरोघरी तसेच विविध संस्था, संघटनेच्या माध्यमातून १७ सप्टेंबर कन्या राशीच्या शुभपर्वावर विश्वकर्मा पूजन दिन साजरा करतात. अ. नगर येथील विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाने भगवान विराट विश्वकर्मा देवतेची पूजा करून “पूजन दिवस” मोठ्या उत्साहाने केला. यावेळी येथील युवकांनी ज्ञानमंदिराची उभारणी करण्याची कास हाती घेतली असून लवकरच शहरात आद्य शंकराचार्य, संत नरहरी महाराज, जळोजी मुळोजी, संत महंत, भोजलिंग काका, तुकाराम ब्रह्मानंद, श्री गोविंदबुवा आप्रे, हिरोजी इंदुलकर, कालिका माता, शिल्पवेत्ता राम सुतार, आदि शिल्पकारांची माहिती तसेच अन्य चरित्र ग्रंथासह ब्रह्मश्री बाळशास्त्री क्षीरसागर आदिंची मौलिक ग्रंथसंपदा, तद्वतच समाजातील हजारो वर्षांचा इतिहास व
समाजाची निगडित साहित्याचा अमूल्य ठेवा असलेला भांडार
पुर्नजीवित करून नव्या पिढीचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या ग्रंथालयाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धन केले जाणार आहे. या विधायक कार्यासाठी अ. नगर येथील श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाचे युवा कार्यकारी मंडळ पुढाकार घेणार आहे.
अधिक माहितीसाठी
vishwakarma.sahitya17@gmail.com यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.
