चिमुकलीने केली पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.!!
लोकवेध live न्यूज
ना कुठलीही सजावट ना कुठलाही देखावा.फक्त मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन करत संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे पत्रकार दत्तात्रय घोलप यांची ४ वर्षीय कन्या हिंदवी हिने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये माती पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली तसेच मातीच्या गणपती बाप्पाची मूर्ती असल्याकारणाने पाण्यात विघटन लवकर होते म्हणून मातीच्या चिखलापासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची अगदी साधेपणाने घरीच प्रतिष्ठापना केली आहे.
हिंदवी ने केलेल्या गणपती रायाच्या स्थापनेची परिसरात भरभरून कौतुक होत आहे
