मनाची वृत्ती बदलण्याची ताकद हरिनामात असते- ह.भ.प. भगवान महाराज मोरे

पिंपरणे येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

पिंपरणे / लोकवेध live न्यूज / सुभाष भालेराव

मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,मनोवृत्तीत बदल झाला तरच खऱ्या अर्थानं
समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व  हरिनामात आसल्याचे प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज ह भ प भगवान महाराज मोरे यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सुवर्ण महोत्सवी पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. यावळी ते बोलत होते.
सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी पन्नासावे वर्ष असल्याने संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात व दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे उपस्थित होते
पुढे बोलतांना ह.भ.प. भगवान महाराज मोरे म्हणाले की,  दिशाहिन समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद फक्त अखंड हरिनाम सप्ताहातच आहे मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात दुःख रुपी विष पचवल्या शिवाय सुखाचे लोणी मिळत नाही.
 म्हणून कंसरुपी अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्माला आठवा जन्म घ्यावा लागला. तसेच बाळगोपाळांबरोबर एकत्र काला करणे, जेवण करणे यात देवाची दुरदृष्टी होती
पिंपरणे गावचे संजय महाराज देशमुख यांना गिरी पदवी मिळाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आ .बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा सत्कार केला
या सप्ताहात सकाळी वारकऱ्यांना नाश्ता व संध्याकाळी किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत असे सात दिवस धार्मिक कार्यक्रम काकडा,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,हरिपाठ,इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडले
या काळात रामनाथ गिरी,बाळासाहेब साळवे कृष्णा रक्टे,बाळू कर्पे,प्रकाश साळवे , रावसाहेब ठोंबरे,संपत राहींज,सुनिल साळवे, त्रिंबक गिरी चंदू ठोंबरे सुदाम वाकचौरे, नाना वाकचौरे बाबासाहेब साळवे, अण्णासाहेब दिवेकर हिराबाई चिखले सोपान रक्टे आदीनी धार्मिक कार्यात सहकार्य केले
तर सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच नारायण मरभळ,काका गायकवाड अरुणसाहेब देशमुख शिवराम वाकचौरे दिनकरराव वाकचौरे राजेंद्र देशमुख अण्णासाहेब वाकचौरे मिनिनाथ जोर्वेकर, रवी रोहम रामनाथ काळे अजित मांडे अजित देशमुख, गंगाराम वाकचौरे, राहुल बागुल पत्रकार सुभाष भालेराव,दिनकर ठोंबरे निलेश बागुल  किशोर जोर्वेकर,संजय बागुल,कल्याण जोर्वेकर,राहुल निकम पोपट साळवे आदी सह या सप्ताहासाठी ग्रामस्थ, गावातील सर्व युवा मंडळे, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, दुध संस्था, पतसंस्था, विद्यार्थी, शिक्षक, गगनगिरी महाराज विद्यालय, ग्रामपंचायत, जि.प्र.प्राथमिक शाळा या सर्वांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण हे गाव अतिशय धार्मिक वृत्तीचे असून धार्मिक कार्य एकजुटीने करतात या ठिकाणी तुमच्या मागणीनुसार मी या मंदिरासमोर अतिशय भव्य असा सभा मंडप मंजूर करत आहे असे आश्वासन आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात दिले अतिशय महत्त्वाची मागणी  पूर्ण झाल्याने समस्त ग्रामस्थांनी आ. थोरात यांचे टाळ्यांच्या कडकडाटात धन्यवाद मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!