अमोल खताळ पाटील यांच्या मध्यस्तीने वडगाव लांडगा येथे सुरू असलेले राजाराम लांडगे यांचे आमरण उपोषण मागे

संगमनेर / लोकवेध live न्यूज
वडगाव लांडगा येथील भारतीय जनता पार्टीचे राजाराम लांडगे यांनी जल जीवन योजना मधील मनमानी कामकाज, गावातील गौण खनिज अवैध उत्खनन, गावामधे सुरू असलेले अवैध धंदे या विषयांवर २७ जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते. आज उपोषणाला अमोल खताळ पाटील यांनी पाठिंबा दिला व उपोषण मागे घेण्या संदर्भात चर्चा केली.

उपोषण संदर्भात आज सकाळी खताळ पाटील यांनी तहसिलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित प्रतिनिधी उपोषणस्थळी पाठवले त्याप्रसंगी विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यांनी उपोषणकर्ते लांडगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
जल जीवन मधील निकृष्ट कामाचे पाहणी करून त्यामधील त्रुटी, तसेच पाण्याचा स्त्रोत वाढविणेसाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. उद्या सकाळी ११ वाजता तलाठी मॅडम गावातील अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणचा पंचनामा करणार आहे त्यावेळेस उपोषणकर्ते लांडगे व ग्रामस्थ यांच्या समक्ष करणार आहे. पोलिसांनी गावातील अवैध धंदेवर कारवाई केल्यामुळे राजाराम लांडगे यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्ष वैभवजी लांडगे, वाल्मीक शिंदे, बापूसाहेब देशमुख, सुरेश लांडगे, संतोष हांडे, हरिष वलवे, रोहिदास साबळे, अनिल निळे, विकास गुळवे, पांडुरंग लांडगे, मनोहर मोरे, उत्तम लांडगे, कविता लांडगे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
