संगमनेर पंचायत समिती अंतर्गत अमृत कलश यात्रेचे पिंपरणेत जोरदार स्वागत
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत तालुकास्तरावर कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या देशाच्या मातीला नमन तसेच देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा वीरांना वंदन करून आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत.
 या अभियानांतर्गत संगमनेर पंचायत समिती अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा पिंपरणे येथे आली असता पिंपरणेचे सरपंच सरपंच नारायण मरभळ, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे,ग्रामसेवक अशोक कुदळ ग्रां.प सदस्य निलेश बागुल, ग्रामसेवक वृषाली नवले , संजय जाधव,,राहुल निकम,प्रदीप बागुल सर, मनीषा बागुल, प्रतिभा दुर्गुडे, मंदाकिनी मोदड ग्रामपंचायत कर्मचारी नितीन बागुल, सुरेश साळवे, प्रदीप मांडे, आदी सह
ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा यांनी जोरदार स्वागत केले
या अमृत कलश यात्रेमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
या मातीचे आयुष आपल्या पेक्षा जास्त आहे. तालुक्यातील गावागावातील मातींचा समावेश असलेला कलशाची पूजा करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांनाआदरांजली पाण्यात आली. या मातीने अनेक वेळा तिने गुलामगिरी सोसली आहे, पाहिली आहे. पण आज ती स्वतंत्र आहे. हीच माती  दिल्ली ला पाठविणार आहोत. तो एक प्रकारचा मातीचा आणि ज्या मातीपासून आपण घडलो तिचा सन्मान आहे. महारष्ट्र आणि सह्याद्री अनेक वेळा हिमालयाच्या संरक्षण साठी धावून गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीचा राजधानी येथे होणाऱ्या कार्यक्रमात मोलाचं वाटा असला पाहिजे. या कार्यक्रमाचा अजून एक महत्वाचा उद्देश म्हणजे वीरणा वंदन. ज्यांचे आपण उपकार फेडू शकत नाही त्यांना आपण वंदन करतो. आपण नेहमी त्यांच्या उपकरात राहू आणि त्याची जाणीव ठेवून आपल्या कामातून देशाची सेवा करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!