दोन दिवसात जातीयवादी आरोपीना अटक न केल्यास पोलिस स्टेशनसह वाड्यावर मोर्चा घेवून जाणार – विजयराव वाकचौरे

निर्मळ पिंप्री येथे घडलेली घटना ही मानवी समाज्याला काळीमा फासणारी घटना

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

निर्मळ पिंप्री येथे घडलेली घटना ही मानवी समाज्याला काळीमा फासणारी घटना असून या घटनेतील ७१ आरोपी पैकी केवळ ३ आरोपीना अटक झाली पोलिस दबावाखाली काम करत आहेत का ? असा सवाल करत पोलिसांना सुद्धा या लोकांनी मारले मग गप्प का ? उदया पोलिसांवर कोणी ही हात उचलेले हे चालेल का ? याचा पोलिसांसह लोणीकरांना जाब विचारावा लागेल तर दोन दिवसात जातीयवादी आरोपीना अटक न केल्यास पोलिस स्टेशनसह वाड्यावर मोर्चा घेवून जाणार असा घणघणीत इशारा रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिला .

राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील कोळगे कुटुंबा अमानुष जातीयवादी जमावाने हल्ला केल्याने रिपाईसह विविध संघटनेने एकत्र येत बाभळेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी विविध मान्यवरांनी महाराष्ट्राचा बिहार झाला का ? पोलिस दबावाखाली काम करता का ? पालकमंत्र्यांची छुपी साथ आहे का ? असा एक ना अनेक शंका उपस्थित करत तीन तास भर उन्हात लेकरासह पुरुषांनी ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको केला .

यावेळी रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ राष्ट्रीय नेते बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , विभागीय अध्यक्ष भिमा बागुल , राजाभाऊ कापसे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , सुबोध जगताप , मोहन आव्हाड , विलास साळवे , संतोष लोढे , संदिप मगर , बन्शी सातपूते , सुभाष त्रिभुवन योगेश मुन्तोडे , राजेंद्र गवांदे , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , प्रदिप थोरात , नाना त्रिभुवन , कैलास कासार , जनार्धन साळवे , रमा धिवर , वैशाली सोनवणे , सविता थोरात , आदीसह मोठ्या संख्येने मागसवर्गिय समाजातील महीला – पुरुष उपस्थित होते .

यावेळी श्रीकांत भालेराव म्हणाले की , निर्मळ पिंप्री येथील दलित समाज्याच्या दोन कुटुंबांना तारगेट करत २०० ते ३०० च्या जमावांना भ्याड हल्ला केला तेथे पोलिसांनाही धक्काबुकी झाली तरी ही आरोपीना अटक झाली नाही हे मोठी खेदाची बाब असून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आज लेकराबाळासह महीलांनाही उन्हा तान्हात न्यायाकरिता रस्ता रोकोची वेळ आली आम्हाला बाबासाहेबांनी धम्माची शिकवण दिल्याने आम्ही सयंमा वागतो आमचा अंत पाहू नये जर आरोपीना दोन दिवसात अटक केली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसाची असेल असा सज्जड दम दिला .

यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की , निर्मळ पिंप्री झालेल्या घटनेच्या वेळी पी आय सह तीन पोलिस कर्मचारी असल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा जमावाने या कुटुंबाला संपविलेचं असते असे वातावरण दिसत होते तर या हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचे काम होताना दिसत आहे कोण नाशिक वरुन वकील आला त्यांने तर पोलिस स्टेशन समोर आधिकाऱ्यासह पोलिसांनाचा दम दिला आमच्या लोकांना अटक करायचे नाही याचं वकीलावर गुन्हा दाखल करुन अटक करा हल्लेखोरांचे समर्थन करु नका पोलिसांनी दोन दिवसात आरोपीना अटक करा अन्यथा एस पी ऑफिस समोर उपोषणाला बसू असा निर्वाणी इशाराचं गायकवाड यांनी शेवटी दिला .

१ ) तीन तास झालेल्या रस्ता रोको मुळे नगर – शिर्डी , लोणी – श्रीरामपूर रस्ताचं ठप्प झाल्याने प्रवाशाचे हाल झाल्याचे चित्र दिसले

२) दोन दिवसांनी केद्रींय मंत्री ना रामदास आठवले हे निकाळे कुटुंबाला भेटण्यास येणार असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी सागितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!