अमोल खताळ यांच्या धडाकेबाज कामगिरीने अमोल खताळ यांच्या धडाकेबाज कामगिरीने धास्तावलेल्याना त्यांची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार नाही. – वाल्मीक शिंदे
संगमनेर / लोकवेध / live न्यूज
चिकणी गावातील विकास कामांसाठी नामदार विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून मी निधी मागितला होता त्यानुसार स्मशाभूमी सुशोभीकरणसाठी निधी येऊन त्यांचे काम गावातील काँग्रेस कार्यकर्ता व काही ग्रामपंचायत सदस्य भागीदारी मध्ये करत होते. ते काम निकृष्ट सुरू असल्यामुळे मी त्याचा ठेकेदार दर्शन वर्पे यास जाब विचारला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे व्यथित झालेल्याने मी भारतीय जनता पार्टीचे अमोल खताळ पाटील यांच्याकडे तक्रार करून गावातील काही काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला धमकी देत आहे असे सांगितले. त्यामुळे अमोल खताळ यांनी दी. ०३ ऑक्टोंबर रोजी याबाबत पंचायत समिती उपअभियंता नाना अहिरे यांना फोन करून व मेसेज द्वारे तक्रार दिली परंतु त्यांनी काँगेस नेत्यांच्या दबावामुळे दुर्लक्ष करून कामाची पाहणी केली नाही. त्यामुळे अमोल खताळ यांना मी व आमच्या गावातील बीजेपी कार्यकर्ते यांनी केलेल्या विनंती वरून ते दि.०९ ऑक्टोंबर रोजी कार्यकर्तेसह कामाची पाहणी करण्यासाठी आले असता स्थानिक काँग्रेसच्या लोकांनी उपसरपंच यांच्या सहीने सदर काम सुरू असून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे सांगितले तपासणी मध्ये ते सिद्ध झाले. त्यावेळेस ग्रामसेवक यांनी सुद्धा मान्य केले सदर काम अतिशय निकृष्ट झालेले असून आम्ही बिल काढणार नाही.
कामावरूनच अमोल खताळ यांनी बिडीओ नागणे साहेब, उपअभियंता अहिरे यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता त्यांनी सुद्धा कामाचे बिल काढणार नाही जे निकृष्ट काम झालेले असेल ते पुन्हा ठेकेदाराकडून करून घेतले जाईल असे सांगितले.
अमोल खताळ व गावकरी यांनी केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामधे कुठेही तोडफोड झालेली नसून त्यांनतर आता जर काही नुकसान झाले असेल तर त्याला जबाबदार स्थानिक काँग्रेस नेते व ठेकेदार असू शकतो.
चिकणी गावात सत्तेचा गैरवापर नेमके कोण करत आहे हे लोकांना माहीत आहे. निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते. संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जसास तसे उत्तर दिले जाईल असा निर्धार अमोल खताळ यांनी व्यक्त केला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टी कडे लोकांचा ओघ वाढला असल्यामुळे काही दुःखी आहे.
संगमनेर मध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचाराला अमोल खताळ विरोध करत आहे त्यांचे काम चांगले सुरू असल्यामुळे विनाकारण खताळ यांना बदनाम करण्याचे कारस्थान आमच्या गावातील लोकांना हाताशी धरून आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार करत आहे हे सर्व तालुक्याला माहीत आहे. यापुढे संगमनेर तालुक्यातील बीजेपी कार्यकर्ते यांना कोणी धमक्या, दादागिरी केली तर त्याला जश्याच तसे उत्तर अमोल खताळ यांनी दिले आहे. संगमनेर तालुक्याचा इतिहास माहीत नसणाऱ्यानी टीका करताना भान ठेवावे यापूर्वी साखर कारखाना, बाजार समिती, शेतकी संघ व इतर संस्था व इतर सहकारी संस्था याचे संस्थापक कोण आहे ?
संगमनेर मधील ४० वर्षापासून सुरू असलेली एक हाती सत्तेला, दहशतीला, बगलबच्चे यांच्या दादागिरीला, वाळू तस्कर, गौण खनिज तस्कर, निकृष्ट काम करणारे ठेकेदार तसेच बगलबच्चे यांचे सुरू असलेले अवैध धंदे बंद झाल्यामुळे व्यथित झालेले सुसंस्कृत लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्चे यांनी अमोल खताळ पाटील यांचा राजकीय धसका घेतला असल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण जनता सुज्ञ झाली आहे. अमोल खताळ पाटील हे ग्रामीण भागातील काँग्रेस कालावधीतील राजकीय द्वेषातून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात सोडवत असल्यामुळे भावी मुख्यमंत्री व्यथित झाले असून अमोल खताळ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी संगमनेर मध्ये असलेली हिटलरशाही,दादागिरी माध्यातून ग्रामीण शेतकरी, लोकांना दिला गेलेला त्रास, घरघरात लावले गेलेलं भांडणे, निधी केंद्र व राज्य सरकार पण उद्घाटने सुसंस्कृत नेते याला अमोल खताळ यांनी नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून विरोध सुरू केल्यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य आले आहे याचे दुःख काहीना झालेले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयातून प्रेस नोट अमोल खताळ यांच्या विरोधात दिली जाते याचा अर्थ खताळ यांचे काम जोरात सुरू झाले आहे असे वाल्मीक शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
पाहणी वेळेस चिकणी गावातील वाल्मीक शिंदे, मुचकुंद वर्पे, रवींद्र भिकाजी वर्पे, राजेंद्र चांगदेव वर्पे, शिवाजी किसन वर्पे, जगन्नाथ घुले, शशिकांत वाघमारे, वैजनाथ वर्पे, कांताराम वर्पे, ग्रामपंचायत सदस्य संदीप रामचंद्र वर्पे, गोरक्ष वर्पे, सुरेश माळी, विजय वर्पे,अशोक वर्पे यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

