आठशे रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक ; फटाक्याचा स्टॅल परवाना पडला महागात.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
फटाक्याचा स्टॅल लावण्यासाठी परवाना देताना आठशे रुपयांची लाच घेताना संगमनेर शहरातील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास नगरच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी केली. याप्रकरणी यादव यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या निमित्ताने संगमनेर शहर पोलीस आणि तेथे होणारी लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून संगमनेर तालुका हा भ्रष्टाचारात अव्वल असल्याचे पुन्हा सिद्ध होऊ लागले आहे.
सविस्तर माहिती अशी कि
अशी की, येत्या १० दिवसांवर दिवाळी आहे. त्यामुळे, व्यापारी हे फटाक्याचे स्टॅल लावण्यासाठी लगबग करीत आहेत. हे परवाना घेण्यासाठी पोलीस परवानगी, त्यानंतर तहसिल परवानगी आणि मग कलेक्टर कार्यालयातून पुढील प्रक्रिया होते. त्यामुळे, संगमनेर शहरातील एका व्यक्तीने ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी तो संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याच्याकडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने काही पैशांची मागणी केली होती. मात्र, तडजोड म्हणून आठशे रुपये देणे ठरले.
दरम्यान, जे काही करायचे ते सर्व कायदेशीर
करायचे आहे. परवाना देखील कायदेशीर देणार आहेत. मग, यांना पैसे द्यायचे कशासाठी? त्यामुळे, तक्रारदार याने जाब विचारला. मात्र, त्याला पुन्हा आडकाठी घालुन चालढकलपणा सुरू केला. त्यामुळे, वैतागलेल्या तक्रारदाराने थेट नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला. त्यानंतर प्रविणकुमार लोखंडे यांनी त्यांची एक टिम
संगमनेरला पाठविली. ठरल्याप्रमाणे पैसे देणे ठरले आणि त्या क्षणी पोलिसांनी बाळासाहेब यादव याला ताब्यात घेतले. त्यामुळे, संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे .

