गुटख्यावरील छाप्याची बातमी छापणार्या पत्रकार संपादकाला गुटका किंगकडून मेसेज करून धमकी!
गुटखा किंग विरोधात पोलिसात तक्रार दाखल; बेकायदा व्यवसायिकांचा मुजोरपणा वाढला!!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
नुकतेच संगमनेर शहरातील तीन गुटख्याच्या ठिकाणांवर छापे पडून गुटखा जप्त करण्यात आला याबाबतची बातमी प्रकाशित करणार्या पत्रकार संपादक यांना फोनवरून मेसेज करून गुटखा किंगने धमकी दिली असल्याने संबंधित गुटखा डीलरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे यामुळे आता पोलिसात गुन्हे दाखल झालेल्या बातम्या छापल्या तरी धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहे संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर बेकायदा व्यवसायाकांची दिवसेंदिवस मुजोरी वाढत असून आज त्याने फोन वर धमकी दिली उद्या तो हल्ला पण करू शकतो हे नाकारता येणार नाही म्हणून पोलिसांनी अशा धमकी देणार्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी प्रकाशित झालेल्या दैनिक प्रवरा तीर मधील पान नंबर एक वरील संगमनेरी ठोका या सदरात सदरचे गुटख्यावरील छाप्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते यानंतर शहरातील इंदिरानगर भागात राहणारा गुटखा डीलर विजय भागवत याचे नाव सदर बातमीत होते त्याने यानंतर पत्रकार-संपादक धीरजसिंह ठाकूर यांना आपल्या स्वतःच्या फोनवरून मेसेज पाठवून धमकी दिली होती याबाबत फोन करून पत्रकार ठाकूर यांनी विचारणा केली असता सदर गुटखा किंग याने फोनवरूनही धमकी देण्याचा प्रकार केला आहे यामुळे तात्काळ संगमनेर शहर पोलिसात विजय भागवत सह दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचेवर एनसीआर कलम 507 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, बी.जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने संगमनेर शहरामधे संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत सर. डी.एम. पेटिट हायस्कूल ज्युनिअर कॉलेज संगमनेर समोर कांदबरी पान स्टॉल अँड जनरल स्टोअर्स वर छापा टाकला व गुटखाकिंग आरोपी अविनाश नामदेव जगदाळे वय 36 वर्षे रा. श्रीरामनगर, बी.एड. कॉलेज, गुंजाळवाडी संगमनेर याला आरोपी बनवले तर तसेच दुसरा छापा शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर डी. एम. पेटिट हायस्कुल ज्युनिअर कॉलेज समोर श्रीराम किराणा स्टोअर्स मध्ये यातील आरोपी नाव बाळासाहेब शिवाजी नेहे वय 44 वर्षे रा. श्रीरामनगर, संगमनेर ता. संगमनेर जि.अहमदनगर यांनी संगनमताने प्रतिबंधित गुटखा पान मसाला चे मालक नाव विजय भागवत रा. इंदिरानगर, संगमनेर पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांचे सांगण्यावरून संगनमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असून देखील सदर पान मसाला व सुगधित तंबाखु/सुपारी या असुरक्षित, आरोग्यास घातक अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला विमल पान मसाला गुटखा, राज निवास, ऐ.बी. 90 तंबाखू अरबाव सुगंधी पान मसाला,1 तंबाखु रॉयल 717 तंबाखुच्या हिरा पान मसाला, आर. एम. डी. पान मसाला, एम. गोल्ड तंबाखू दुकानात बाळगुन अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता पान स्टॉल येथे विक्री करतांना रंगे हाथ आढळून आले आहे घटनास्थळ क्रमांक. 1 येथे रु. 2520.दोन हजार पाचशे विस रूपये किमतीचा तर. घटनास्थळ क्रमांक.2 येथे रु. 3,215 तिन हजार दोनशे पंधारा रूपयाचा असा एकूण 5375 पाच हजार तिनशे पंच्याहत्तर रुपये. किमतीच्या मुद्देमालासह मिळून आले आहे. सदर गुटखा विक्रेतांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामधे गुरनं 903 /2023 व गुरनं 903/2023 भारतीय दंड संहिता कलम- 328/272,/273,/188/,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असे वृत्त प्रकाशित केले होते यानंतर विजय भागवत रा. इंदिरानगर याने त्याच्या मोबाईल नंबर 8788132031 वरून पत्रकार संपादक ठाकूर यांना फोनवर मेसेजकरून दमबाजी करून धमकी दिली या कामी आरोपी नंबर 2 देवादाजी (पूर्ण नाव माहित नाही)याचे मदतीने सदर धमकी दिली अशी तक्रार शहर पोलिसात दाखल केली यावरून एनसीआर नं. 1481/2023 कलम 507 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पो.नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनात पो.ना. गवळी हे करत आहेत. यामुळे आता बेकायदा व्यवसाय करणार्यांची मुजोरी वाढली असून पोलिस स्टेशनमधे गुन्हे दाखल असलेल्या बातम्या छापल्या तरी पत्रकारांना धमकी देण्याचे प्रकार संगमनेरात वाढले असल्याचे दिसून येते पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संपादक ठाकूर यांनी केली आहे.
