संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सर्वांनी खंबीर साथ दिल्यास आरक्षण मिळणारच-शिवाजी महाराज दाते
संगमनेर / लोकवेध live न्यूज
इतिहासाचा धडा घेऊन मराठ्यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणे गरजेचे आहे.
इतिहास काळात मराठी पराक्रमी असताना देखील दुर्दैवाने हारले, आज देखील पराक्रमी आहेत पण प्रस्थापित मराठे/पुढारी मागील दोन महिने कुंभकर्णाची झोप घेत होते, असंच म्हणावं लागेल.
कारण पूर्ण महाराष्ट्रभर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत, पण हे मराठा राजकारणी पुढारी गावागावांतुन, रस्त्यावर त्यांना साथ द्यायचे सोडून टार्गेट करत आहेत.
सर्वसामान्य मराठा बांधवांनी बोध घेऊन कुठल्याही राजकीय आमिषाला बळी न पडता मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना साथ दिल्यास आरक्षण मिळणारच. शासनाने मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया मराठे का हारले पानिपत… कादंबरीकार, प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. शिवाजी महाराज दाते यांनी कॅंडल मार्च प्रसंगी दिली.

