प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ कुणबी-मराठा आरक्षण जीआर द्या- राहुल ढेंबरे पाटील
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मराठा संघर्षयोद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण समर्थनार्थ कॅंडल मार्च मध्ये सहभागी झालेल्या साकुर पठारभागातील सर्वधर्मीय समाज बांधवांचे मन:पुर्वक अभिनंदन… सर्वधर्मीय समाज बांधव सकल मराठा समाजाच्या सदैव सोबत असुन ठराविक सडक्या डोक्यांनी तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. प्रशासनाने सर्वच समाजात तेढ निर्माण करणारांवर अंकुश ठेवावा. महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु साहेब, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री अमीतजी शाह साहेब दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा संघर्षयोद्धा मनोजभाऊ जरांगे पाटील आणि गरजवंत मराठा समाजाला कुणबी-मराठा हक्काचे आरक्षण देऊन न्याय द्या.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची शपथ घेतली पण आरक्षण कधी देणार हे सांगितले नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सातासमुद्रापार पोहोचला तरीही राज्यकर्त्यांना गांभीर्य नाही, दररोज आत्महत्या होत आहेत, आणखी किती बळी घेतल्यावर आरक्षण देणार. गावबंदी झाल्यानंतर एक एक मराठा आमदार/खासदार आरक्षणाला पाठिंबा/राजीनामा देत आहेत. आता पाठिंबा नको/एक एक राजीनामा नको. तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा नाहीतर समुहाने राजीनामा द्या. गावबंदी असताना कुठल्याही लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातील कोणत्याही गावाकडे रस्त्यावर फिरकु देऊ नका, अशा तीव्र भावना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी कॅंडल मार्चला संबोधित करताना व्यक्त केल्या.
