कनोलीत गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

कनोली गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सभासदांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने आयोजन  केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सौ उज्वला जगताप व श्री मच्छिन्द्र जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळेस  अध्यक्ष उज्वला जगताप , मच्छिंद्र जगताप  उपाध्यक्ष कैलास मकासरे,  सचिव देवेंद्र चव्हाण, अमोल बागुल, संदीप जगताप, राहुल चव्हाण, ज्योती भालेराव या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सदस्यांची उपस्थिती होती. समता रक्तपेढी या  संस्थेने रक्तदात्यांकडून रक्त   संक्रमण करून घेतले. समता रक्तपेढीचे प्रमुख  डॉ. इरफान व भूषण देसले,  यांनी शिबिराला उपस्थिती लावून आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!