जाखुरीत साठ ते सत्तर हजार रुपयाची बोकडे चोरी गेल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर दुःखाचे सावट
पिंपरणे / लोकवेध / live न्यूज
जाखुरीत दिवाळी तोंडावर आली असता शेतकऱ्याच्या आनंदावर बोकडे चोरी गेल्याने विरजन पडले आहे
शेतकऱ्यांनी रक्त मासानी वाढवलेले बीटल जातीची दोन बोकडे अंदाजे 60 ते 70 हजार रुपये किमतीचे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने शेतकऱ्याच दिवाळीतं दिवाळ निघाल आहे सदर घटना
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे दशरथ नारायणराव देशमुख यांच्या वस्तीवर आज्ञात चोरट्यांनी दोन बोकड चोरून नेले सदर घटना बुधवारी रात्री बारा ते दोन या दरम्यान घडली सदर बोकड हे बिटल जातीचे असून त्यांची अंदाजे किंमत साठ ते सत्तर हजार रुपये होती पाऊस यंदा पाऊस मुबलक प्रमाणात न पडल्याने शेतकरी आजच अडचणीत आहे त्यात बिबट्याची भीती आणि आता चोरट्यांचा सुळसुळाट शेतकरी वर्गाने जगायचं कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे दिवाळी असल्याकारणाने पोलीस वाढत्या चोरांकडे लक्ष द्यावे स्थानिक रहिवाशांनी केली आहे
यावेळी दशरथ नारायणराव देशमुख, गोविंद देशमुख, शिवराज देशमुख, अजित शरद देशमुख, वैभव देशमुख, संजयगिरी देशमुख, काभूशेठ राहणे, हेमराज वर्पे, राजेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख, योगेश देशमुख, भास्करराव देशमुख, वसंतराव देशमुख आधी उपस्थित होते यांनी ही मागणी केली आहे
