चोरांनो चिमुकल्यांच अन्न तरी चोरू नका : अंगणवाडीतून किराणा सामान व गॅस टाकी,चोरी ईनव्हटरची चोरी
आश्वी : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बु ॥ येथील गायकवाड वस्ती वरील अंगणवाडीतून साखर , मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर बुधवारी रात्री चोरीला गेल्याने मोठी खळखळ उडाल्याने भुरड्या चोरांनी १० हजार रुपयेच्या ऐवाजावर डल्ला मारला .
आश्वी गावांपासून दोन कि मी अंतरावर असणार्या निमगांवजाळी कडे जाणारा रस्ता व प्रवरा नदीच्या डाव्या कालव्या लगत असणार्या गायकवाड वस्तीवरील अंगणवाडीमधून गॅस सिलिंडर व ईन्व्हटर बुधवार दि ४ आक्टोबर रोजी रात्री चोरीला गेल्याची माहिती अंगणवाडी सेविका श्रीमती मंगल गायकवाड व मदतनिस श्रीमती निता गायकवाड यांनी पोलिस स्टेशन व ग्रामपचायतीला कळविले
प्रवरा नदीच्या डाव्या कालव्या जवळील अंगणवाडी व किंचनच्या दरवाजाचे कडी कोणड्याला न तोडता केवल कुलुप तोडल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून अंगणवाडीतून कुठलीही वस्तू गेली नाही मात्र किंचनमधून नुकतीच गॅस भरलेले सिंलिडर व ईन्व्हटर , साखर , मुगदाळ असा १० हजार रुपयेचा ऐवाज चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून दहा दिवसापुर्वी ग्रामपचायत कर्मचारी विजय आवारी यांची घरसमोरुन मोटार सायकल चोरीला गेल्याने भुरट्या चोरटयाचा सिलसिला सुरु असल्याने पोलिसा पुढे आता आश्वी व परिसरात मोठे आव्हान निर्माण झाले आहे .
अंगणवाडीतून साखर , दाळीसह गॅस सिलिंडरचं चोरीला गेल्याने चिमुकल्यांना एक दिवसाकरिता आपल्या आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली .
