मुख्याधिका-यांनी गांभीर्याने घेतली दखल;
कृती समितीचे उपोषण स्थगित; मागणीची पूर्तता न केल्यास 22 नोव्हेंबरला उपोषण पूर्वव्रत
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भरत रेघटे
मी एक संगमनेरकर म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने म्हाळुंगी नदीवरील पडलेला पूल निर्माण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन यांच्याशी सातत्यपणे वेळेवर निवेदन व पत्र व्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तद्वतच पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पूल बनाव कृती समितीचे सदस्य यांच्यामध्ये
वारंवार चर्चा व
संवादातून नाशिक पीडब्ल्यूडी, अहमदनगर जिल्हाधिकारी यांची बांधकाम परवानगी मिळवली परंतु पुढील काही तांत्रिक अडचणीमुळे या कार्यास विलंब होत गेल्याने पूल बनाव कृती समितीच्या वतीने या संदर्भात काही गोष्टी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही विलंब झाल्याकारणाने व संवादातून तोडगा न निघाल्याने कृती समितीने ऐन दिवाळीच्या तोंडावर साखळी उपोषणाचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर दि. 8 ला सायंकाळी सहा वाजेपर्यंत पालिका प्रशासनाच्या उत्तराची वाटही बघितली. परंतु प्रशासनाने यावर संपर्क न साधल्याने मी एक संगमनेरकर पुल बनाव कृती समितीने उपोषणाचे हत्यार उपसले आणि तात्काळ सायंकाळी 7 वा. स्वामी समर्थ मंदिरा जवळ साखळी उपोषणाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 7 ते 9 तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तीन दिवस साखळी उपोषणानंतर आमरण उपोषण सुरूवात केली.
▪️▪️▪️▪️▪️
पालिकेला आली खडबडून जाग
पालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी सदर आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता गांभीर्याने दखल घेत उषोषण स्थळी रात्री 8 वाजता भेट देत संवाद साधला. दिवाळीच्या सणावर नागरिकांनी अशी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये तसेच प्रशासन धर्तीवर पूल निर्माण होण्यासाठी व प्रशासकीय यंत्रणेतील त्या त्या विभागाशी संपर्क करून तांत्रिक अडचणीही दूर करण्याचे लेखी आश्वासन दिले. असून येत्या 22 तारखेपर्यंत आपण यासंबंधी कागदपत्राची पूर्तता पूर्ण करणार असल्याचे मुख्याधिकारी वाघ यांनी सांगितले. तसेच पूल बनाव कृती समितीला रात्री 10 वाजता पालिका प्रांगणात लेखी पत्र दिल्याने साखळी उपोषणा बरोबर आमरण उपोषण समितीच्या वतीने 22 तारखेपर्यंत स्थगित केले.
▪️▪️▪️▪️▪️
पूल कार्यास सुरूवात न झाल्यास उपोषण करणार पूर्वव्रत :- कृती समिती
….. म्हाळुंगी नदीवरील पुल बांधकामाच्या संदर्भात 22 नोव्हेंबर ला समाधानकारक उत्तरे आणि कृती न दिसल्यास पूल बनाव कृती समितीचे सदस्य व घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन येथील नागरिकांच्या वतीने 22 तारखे नंतर स्थगित केलेले उपोषण पूर्ववत सुरू करणार असून तद्वतच या उपोषण दरम्यान कोणतेही कामकाज न झाल्यास साखळी उपोषणासह आमरण उपोषणाचा इशाराच कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे.
