संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी तालुक्यातील नावाजलेली संस्था असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अतिशय प्रगतीपथावर आलेली आहे या संस्थेतर्फे चालु वर्षाचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रम संपन्न झाला संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव राहींज यांच्या शुभहस्ते शेतकरी सभासदांना डिव्हिडंड ची रक्कम वाटप करण्यात आली
यावेळी संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव राहींज शरद मांडे काकासाहेब गायकवाड भाऊराव देशमुख नवनीत देशमुख अरुणसाहेब देशमुख राजेंद्र देशमुख प्रदीप देशमुख रंगनाथ जोर्वेकर रामनाथ काळे कृष्णबाबा रक्टे शंकर देशमुख सोसायटीचे सचिव मैंदड साहेब एकनाथ निकम आदीसह सभासद उपस्थित होते
यामुळे अतिशय आनंदात आणि भरभराटीत ही दिवाळी सभासदांची होणार आहे चांगला डिव्हीडंड वाटप केल्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात माजी आ सुधीरजी तांबे संगमनेर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, यांनी चेअरमन,व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले व दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या