आधारने केली २०० वंचित कुटुंबियांची दिवाळी गोड….!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
सर्वत्र दिवाळीचा उत्साह, आनंदोत्सव सुरू असतो. घराघरात- दारादारात , अंगणात दिवाळीचे दिवे मिणमिणत असतात. पण आपल्या आसपास काही कोपरे असे असतात ,जिथे अंधार असतो . असे काही कुटुंब मात्र या उत्सवापासून वंचित असतात. अशा वंचितांच्या , भटकंती व मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या झोपडीवर जाऊन आधार फाउंडेशन परिवाराने दिवाळीच्या दिवशी सकाळी दिवाळी साजरी केली. लमाण तांडा(लोहारे मिरपूर), गोलवड वस्ती(कुरण), बर्डे वस्ती (सोनुशी), बिरेवाडी, माळी वस्ती(निळवंडे), हिवरगाव पावसा टोल नाका आदि ठिकाणच्या एकूण 200 कुटुंबियांना दिवाळी फराळ , मिठाई व साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आधारचे शिलेदार प्राचार्य पी.आर.शिंदे,प्रा.किसन दिघे,भानुदासआभाळे-पुणे, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे,सुशिला हासे,
शिव व्याख्याते दीपक कर्पे, योगतज्ञ सुभाष पाराशर,प्रा.धोंडिभाऊ गुंजाळ, अरविंद गाडेकर,माजी सैनिक लक्ष्मण ढोले, निवृत्ती शिर्के, देविदास गोरे, रामदास सोनवणे,सुभाष ताजणे,संजय अभंग,भारत ताजणे सचिन कानवडे, सखाराम तळपाडे, आदिसह प्रत्येक वस्तीवरील सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प प्रमुख तान्हाजी आंधळे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.या २०० वंचितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दिड किलो दिवाळी फराळ-लाडू,करंजी, शेव-चिवडा,चकली,बाकरवडी, प्रत्येक माता-भगिनींना नवी कोरी साडी व बाळगोपाल मंडळीस खाऊ मिळाल्याने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.आधारच्या सर्व क्षेत्रातील देणगीदारांच्या दातृत्वातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. आधारच्या दिवाळी उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. घासातला घास वंचितांसाठी देऊन आधार परिवाराने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन योगतज्ञ सुभाष पाराशर यांनी केले.भानुदास आभाळे,अरविंद गाडेकर,किसन हासे,निवृत्ती शिर्के,देविदास गोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. वाकचौरे,राजू रहाणे,आर.जी.पावसे,दस्तगीर शेख,सुरेश साळुंके,रमेश डोंगरे,कैलास वराडे,आदित्य कोते,संतोष शेळके,मनोहर यादव,मच्छिन्द्र पावसे,शारदा अरगडे,मंदा कडलग, नामदेव इल्हे,अविनाश वाकचौरे,विजय फापाळे,सुभाष वारुंक्षे यांसह सर्व आधार समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.


