आदर्श व्यक्ती,कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व – (डॉक्टर) गंगाराम वाकचौरे

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत मानल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावत शेतकरी कुटुंबात जन्मलेले एक उमदे नेतृत्व म्हणजे डॉक्टर गंगाराम वाकचौरे गावातील राजकीयसामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे लहानांपासून ते थोरांपर्यंत अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व अतिशय धडाडीचा कार्यकर्ता म्हणून तालुक्यात ओळख निर्माण असलेले
ग्रामीण भागातील आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करून केवळ गावातच नव्हे तर तालुक्यातही अनेकांच्या हृदयांत त्यांनी आपले स्थान निर्माण केले. डॉक्टर गंगाराम वाकचौरे यांनी
आपली विशिष्ट ओळख निर्माण केली. विश्वसनीयता नम्र स्वभाव, कमालीचा संयम आणि कार्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा आढावा घेणारा हा लेख…

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ऐतिहासिक गावात गंगाराम वाकचौरे यांचा १४/११/१९६० साली जन्म झाला त्यांचे वडील राघू वाकचौरे वडिलांची परिस्थिती बेताची होती  गरीब परिस्थितीत ही त्यांचे कॉलेज पर्यंत शिक्षण झालं त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक औषधांचे शिक्षण घेतलं त्यांनी जनसेवा करण्याचे ठरवले त्यातून ते गोरगरिबांना औषधी देऊन आजार बरे करू लागले त्यामुळे त्यांना लोक डॉक्टर म्हणू लागले डॉक्टर हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की त्यामुळे आजही गावातच नव्हे तर तालुक्यातही लोक त्यांना स्वतःच्या नावाने न ओळखता डॉक्टर नावानेच ओळखतात डॉक्टर की बरोबरच शेती व्यवसायही ते चांगल्या प्रकारे करू लागले.नंतर शेती व डॉक्टरकीचा व्यवसाय करत असताना त्यांचे लग्न झाले त्यांना दोन अपत्य झाली एक मुलगा एक मुलगी मुलांची शिक्षण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले मुलगा अमोल यास मेडिकलचा व्यवसाय सुरू करून दिला समाजसेवेची आवड तसेच राजकारणातही त्यांना रस असल्याने त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीत संचालक पद ही भूषवले आहे गावातील यात्रा असो किंवा सप्ताह डॉक्टरांचा सहभाग अतिशय मोलाचा असतो गावातील सामाजिक राजकीय कार्यक्रम असो डॉक्टरांचा सहभाग त्यात असणारच तरुण असो या म्हातारे डॉक्टर अशी सर्वांचे प्रेमाचे संबंध  असे कार्य त्यांच्या हातून घडत आहेत
कार्यकत्याची क्रियाशीलता आणि विचारावरील त्याची ज्वाजल्य निष्ठा त्याला ताऊन सुलाखुन तनिष्क बनवते तरीही सच्चा कार्यकर्ता बुद्ध आणि तुकोबांच्या विचारांप्रमाणे भौतिक सुखाला गौण समजतो.
डॉक्टर वाकचौरे हे आपल्या जीवनात सतत कृतिशील आणि प्रयत्नवादी राहिले त्याचीच फलनिष्पती हिच आहे कि आज संगमनेरचे लोकप्रिय आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे वजनदार लोकनेतृत्व मा.महसुल मंत्री मा.आ.बाळासाहेब थोरात,मा.आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, मा.इंद्रजित थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, विद्यमान आमदार सत्यजित तांबे,भावी आमदार जयश्री थोरात आ. बबनराव घोलप यांच्या सह असंख्य श्रेष्ठीच्या आणि राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये सक्रिय असुन त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे जनसेवेतुन समाधान एक प्रकारे डॉक्टर गंगाराम वाकचौरे हे नाव  त्यांनी सिद्ध केले आहेत त्यांचा निष्कलंक आणि निर्मळ स्वभाव या डॉक्टर गंगाराम  नावाला साजेसा आहे.तसेच राजकीयदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या पिंपरणे गावच्या राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख झालेली आहे

मृत्युलोकीं आम्हा आवडती परी! नाहीं एका हरिनामें विण!!
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि!वमन हें मनी बैंसलेंसे !!धृ!!
सोनें रुपें आम्हा मृत्तिके समान!माणिकें पाषाण खडे तैसे!!
तुका म्हणे तैशा दिसतील नारी!रिसाचियापरी आम्हा पुढे !!३!!

अशा या तुकोक्ती प्रमाणे त्यांचा स्वभाव आणि संन्यस्थ वृत्तीचे जीवन निश्चितच आम्हा नवयुवकांना प्रेरणादायी दिशादर्शक आहे.त्यांच्या शुभेच्छामुळेच अनेकांची माणुस बनण्याची प्रक्रिया आरंभ होते‌.

नेहमी लोकांच्या सुख दुःख समयी सदैव तत्पर असलेले डॉक्टर वाकचौरे म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच आहे आर्थिक,सामाजिक राजकीय कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरतांना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो अशावेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाची जवळीक साधत नाही,मनुष्य हा तिरस्कार भावनेच्या आधारे जगु शकत नाही,तो प्रेमाच्या आधारावर भक्कम उभा राहतो असा आत्मविश्वास आणि नेहमी सकारात्मक विचार मांडणारे माननीय डॉक्टर गंगाराम वाकचौरे आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने…
अनेकांच्या सुख दुःख ‌समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.

पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या ‌सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारे डॉक्टर गंगाराम वाकचौरे म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच…

वाढदिवस एका नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा…
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या विश्वासाचा ..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा डॉक्टर साहेब
Wish You Happy Birthday..

*पत्रकार सुभाष भालेराव*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!