नववीच्या  सार्थक चिखले ने माती व चिखलापासून बनविला  सुप्रसिद्ध हरिचंद्र गड 
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 लहानपणीच मुलांना विविध छंद असतात सध्याच्या कलयुगात मुलांना सर्वात जास्त मोबाईलचा छंद आहे परंतु त्याला अपवाद पिंपरणेतील चिखले परिवारातील सार्थक  ठरला आहे अभ्यासात तर हुशार आहेच परंतु दिवाळीची सुट्टी मोबाईल किंवा खेळण्यात न घालवता प्रत्येक दिवाळीत वेगवेगळ्या किल्ला बनविण्याचा त्याचा छंद अफलातून आहे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल अपार श्रद्धा प्रेम  यातूनच त्यालाही प्रेरणा मिळाली  गेली सात वर्षापासून सार्थक वेगवेगळ्या ठिकाणच्या किल्ल्याची प्रतिकृती बनवत आहेत सुरुवातीला शिवाजी महाराज यांचा जन्म स्थळाचा किल्ला शिवनेरी बनवला त्यानंतर सिंहगड भुईकोट किल्ला राजगड प्रतापगड पेमगिरी चा शहागड आणि यावर्षी अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध सह्याद्रीच्या कुशीतील कळसुबाई शिखर व हरिश्चंद्रगड बनविला
 गेली पंधरा दिवस विविध पुस्तकातून अभ्यास करून किल्ले विषयी माहिती मिळवली व त्याप्रमाणे किल्ल्याची प्रतिकृती साकारली
 किल्ल्यासाठी लागणारे विविध वस्तू दगड माती छोट्या छोट्या मूर्ती त्याने गोळा करून स्वतःच्या हाताने किल्ला बनविला किल्ल्याच्या पायथ्या जवळील गाव हा किल्ला मुघलांच्या ताब्यात कसा गेला त्याची प्रतिकृती इंग्रजांनी राज्य कसं केलं पायथ्याशी असलेले छोटसं गाव सार्थक ने अतिशय बारीक सारीक गोष्टींची मांडणी सार्थक व्यवस्थित केली आहे  त्याला वडील विकास चिखले, आई कविता चिखले,आजी हीराबाई चिखले, चुलते  प्रवीण व प्रशांत चिखले   यांनीही मदत केली
 परिसरातून सार्थक च्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे काही आई वडील मुलांना घेऊन खास किल्ला बघण्यासाठी येतात व सार्थक च्या कलेच  कौतुक करतात
 हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गावाजवळ असून चार हजार फूट उंचीवर गिरीदुर्गात या किल्ल्याचा समावेश होतो
हरिश्चंद्रगड किल्ल्याची उत्पत्ती 6व्या शतकात, कलाचुरी राजघराण्याच्या काळात झाल्याचे म्हटले जाते.या काळात हा किल्ला बांधला गेला. विविध लेणी बहुधा 11व्या शतकात कोरल्या गेल्या असतील. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत
महान ऋषी चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करीत असत.
लेणी त्याच कालखंडातील आहेत. किल्ल्यावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशात अस्तित्वात असलेली बांधकामे येथे विविध संस्कृतींचे अस्तित्व दर्शवतात.
नागेश्वर (खिरेश्वर गावातील), हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील आणि केदारेश्वराच्या गुहेतील कोरीव कामावरून हा किल्ला मध्ययुगीन काळातील असल्याचे सूचित होते.
कारण तो महादेव कोळी जमातीचा टोटेम म्हणून महादेवाशी संबंधित आहे.
ते मोगलांच्या आधी गडावर नियंत्रण ठेवत होते. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
1747 मध्ये मराठ्यांनी ते ताब्यात घेतले
सार्थक विकास चिखले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!