हिंदू धर्माची संस्कृती जपण्याचे व्यासपीठ वरून आरक्षणावर बोलणे उचित नाही. मनोज जरांगे पाटील 

अकोले पट्टा किल्ला  / लोकवेध live न्युज 

हिंदू धर्माची संस्कृती जपण्याचे व्यासपीठ वरून आरक्षणावर बोलणे उचित नाही. छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्श दिनाच्या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात, छत्रपतींचा आदर्श जतन करत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने सर्वांनीच मार्गक्रमण करणे हेच खरे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ला (विश्रामगड) येथे शिवपदस्पर्श दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तिरडे पट्टेवाडी परिसरातील आदिवासी गावकरी व तालुक्यातील जनतेच्या वतीने जरांगे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा म्हणून कळस बू येथे अन्नत्याग आंदोलन करणारे शांताराम वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, अशोक वाकचौरे यांनचा सत्कार मनोज जरांगे पाटील यांचे हस्ते करण्यात आला. आदिवासी समाजाचे वतीने अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव, गणपत गोडे यांनी सत्कार केला. अखिल भारतीय मराठा महासंघा चे अकोले शहर अध्यक्ष अक्षय आभाळे, अंकुश वैद्य, तानाजी देशमुख यांनी पाणी वाटप केले. अकोले पोलीस स्टेशन चे पी आय करे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी प्रदीप सोळंकी, डॉ. संदीप कडलग, दिलीप शेणकर, वसंत मनकर, महेश नवले, सोमनाथ नवले, अरुण शेळके, भाऊसाहेब वाकचौरे, कैलास जाधव, प्रदीप हासे, मनोज मोरे, सचिन दातीर, राजेंद्र गवांदे, माधव तीटमे, सुधीर शेळके, जालिंदर बोडके, महेश सोनवणे राहुल शेटे, सुरेश नवले, देवराम लोहटे, ज्ञानेश पुंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!