मी मरेपर्यंत माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करू शकत नाही – मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणाच्या आडवं येणाऱ्याचा मी नक्कीच करेक्ट कार्यक्रम करेल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्रात गेली 70 ते 75 वर्षा मरा ठ्यांच्या जीवावर राज्य पक्ष मोठे झाले त्यांना आपण मोठे केले परंतु आजमराठा समाजाला त्यांची गरज भासू लागली त्या वेळी एकही मराठा नेता आगर ओबीसी नेता पुढे आला नाही तेच आपले खरे शत्रू आहे अनेक ओबीसी नेत्यांनी ३०ते ३५ वर्ष सत्ता भोगली आणि तेच आता जाती-जातीत मतभेद निर्माण करून त्यांच्या भांडणे लावण्याचे काम करत आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मराठ्यांनी एकजूट करायला हवी आहे मराठा आरक्षणाच्या आडवं येणाऱ्याचा मी नक्कीच करेक्ट कार्यक्रम करेल असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मराठा समाजाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की जर सरकारने हेच आरक्षण आता देण्याऐवजी 70 वर्षांपूर्वी दिले असते तर आज मराठा समाजाची मुलं आईएएस यूपीएस झाले असते परंतु ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली मराठ्यांच्या मुलांना काम करावं लागत आहे ही यादी राज्यातील खूप मोठी खरी शोकांतिका आहे मराठा आरक्षणाची लढाई आपण 80 टक्के जिंकलो आहे
गेली 70 वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करणार असे सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारला जाग आली आणि सरकारने कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समितीला दिले शिंदे समितीने हे काम जलद गतीने केले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील जवळजवळ 32 लाख कुणबी नोंदी शोधल्या गेल्या आहेत त्यामुळे सरासरी दोन कोटी मराठा समाजाच्या मुलांना प्रमाणपत्र मिळणार आहे
जरांगे पाटील म्हणाले की, मी मरेपर्यंत माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करू शकत नाही आतापर्यंत मराठ्यांचा विश्वासघात झाला असून त्यामुळे मराठ्यांना आरक्षण दिले नाही.ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही त्यांचे नाव आम्हाला कळू द्या आता सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. या राज्यात ३२ लाख मराठा नोंदी आरक्षणात असलेल्या सापडल्या असून कुणबी प्रमाणपत्रही देण्याचे काम सुरू झाले. हे आपले यश आहे. सत्तर वर्षांपूर्वीच आपल्याला आरक्षण होते मात्र ते कधीच समजावून दिले नाही आता महाराष्ट्राच्या काना- कोपर्यातील मराठा समाज मोठ्या ताकदीने एकवटला आहे.आता सरकारला दखल घ्यावी लागली आहे.
आरक्षण नसल्याने आतापर्यंत अनेकांचे जीव गेले तरी नोकरीत आरक्षण नाही आरक्षण हा आमचा हक्क आहे म्हणून आम्ही तुमच्याशी भांडत आहे. सरकारने २४ डिसेंबर पर्यंत वेळ मागीतला आहे. मराठ्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी कधीच विरोध केला नाही मात्र आज तेच लोक मराठ्यांच्या विरोधात उभे राहिले आहे ज्यांना मराठ्यांनी मोठे केले असून ते मराठ्यांच्या विरोधात आहे. आज खर्या अर्थाने मराठ्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज पडली तर मराठ्यांच्या पाठिशी कोणी नाही ज्यांना मदत केली तेच आज मराठ्यांच्या मुलांच्या विरोधात आहे. सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर आमचीही मराठा समाजाची मुले आयपीस अधिकारी असते..पण तसे झाले नाही.
प्रवीण सांळुखे यांनी मार्गदर्शन केले
ओवी प्रवीण चौधरी गार्गी चंद्रकांत घुले हिने भाषण करून सर्वांचे मन जिंकले अंतारावली सराटी येथील अरुण घोगरे पाटील यांनीजय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठा नेता माजी आ अण्णासाहेब पाटील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील पोवाडा गायला हिंदू राजा ढोल पथकाने मनोज जरांगे पाटील यांचे सलामी देत स्वागत केले या वेळीलता कातोरे निलिमा खाताळ आशा काळे संजना शेळके सुनीता सातपुते यांनी औक्षण केले एकच मिशन मराठाआरक्षण कोण म्हणतं घेतल्याशिवाय राहत नाही एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महराज की जय छत्रपतीसंभाजीमहाराज की जय मनोज जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ है तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी जाणता राजा मैदान दणाणले होते ही सभा यशस्वी करण्या साठी संगमनेर शहर व तालुका सकल मराठा समिती संयोजन समिती आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाला बंदोबस्तासाठीसुर्या करियर अकॅडमीच्या स्वयंसेवकांनी साह्य केले सुखदेवजोंधळे पाटील अशोक काशीद अमोल भोकनळ शहाजी काळे अण्णासाहेब काकड यांच्यासह मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे खंडू सातपुते अभिषेक थोरात अमित गुंजाळ विकास पुंड सुनील मोरे यांच्यास अनेक आमरण उपोषण करणाऱ्या तालुक्यातील तरुणांचा जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
