शाळेसाठी सरपंचांनी स्वतःने कष्ट करत केली सांडपाणी पाईपलाईनची जोडणीपिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ यांचा कर्तव्यदक्षपणा
पिंपरणे / लोकवेध live न्युज
कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून नावाजलेले संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सरपंच नारायण मरभळ यांच्या कर्तव्यदक्षणाचा प्रत्यय नुकताच गावातील जिल्हा परिषद शाळेला आला मराठी शाळा म्हणजे गावची शान गावातील शाळेला सांडपाण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे शाळेच्या परिसरात डास मच्छर झाले होते त्यातून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी सरपंचांना एक फोन केला सरपंच त्या ठिकाणी तात्काळ येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामपंचायत कर्मचारी गावातील वार्डातील सदस्य निलेश बागुल यांना बोलवून घेतले जेसीबीच्या साह्याने चर खोदून सरपंच व सदस्य कर्मचारी यांनी स्वतः पाईपाची जोडणी केली सांडपाण्यासाठी खड्डा केला होता तो ही जेसीबीच्या साह्याने बुजून टाकला शाळेपासून शंभर फूट लांब पाईपची जोडणी करून दूर पाणी सोडले एका फोन मध्ये तात्काळ काम झाले त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे व शिक्षक प्रदीप बागुल मंदाकिनी मोदड ,प्रतिभा दुर्गुडे मंदादेवी गवारी अनिता मुरडनर यांनी सरपंचाचे आभार मानले यावेळी सरपंच नारायण मरभळ सदस्य निलेश बागुल कर्मचारी सुरेश साळवे प्रदीप मांडे उपस्थित होते
