संगमनेर ते पंढरपूर सायकल दिंडी रवाना.. गावोगाव देणार पर्यावरणपूरक संदेश…
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर ते पंढरपूर सायकल दिंडीचे प्रस्थान आज संगमनेरातील श्री संत गुरुवर्य किसन महाराज आश्रम,विठ्ठल मंदिरापासून हरीनामाचा जयघोष करत झाले.ह.भ.प.रामेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.याप्रसंगी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज कर्पे,संजय कडलग,विठ्ठल कडूसकर,सोमनाथ मदने आदिसह काकड आरतीचे भजनी मंडळ उपस्थित होते.या सायकल दिंडीतील वारकरी एकूण ३०० किमी अंतर सायकलवरून पार करणार आहेत.या दिंडीत २४ सायकलस्वार सहभागी झाले आहेत.
गावोगावी पर्यावरणपूरक संदेश देत या दिंडीतील सायकलस्वार स्वतःची शारीरिक क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. युवा उद्योजक तथा विठाई ग्रुपचे समन्वयक सुभाष ताजणे यांनी सायकल दिंडीची माहिती दिली.
याप्रसंगी पतित पावन संघटनेचे प्रा.एस झेड देशमुख सर यांनी शुभेच्छा दिल्या. विजय फापाळे यांनी सायकल दिंडीतील उपक्रमविषयक मनोगत व्यक्त केले.सायकल दिंडीसाठी बाळासाहेब बनकर यांनी साऊंड सिस्टिम व्यवस्था मोफत केलेली आहे. दिंडीच्या यशस्वीतेसाठी संजय अभंग,भारत ताजणे,रामराव कडलग,गोरक्षनाथ भोकनळ,नंदू कुडेकर,अशोक शेटे,अजित वैद्य,महेश पुंड,आकाश ताजणे,ओम ताजणे,हेमंत पाबळकर,सुहास साबळे,प्रतिक दोरगे,गोरक्षनाथ सरोदे,सुनील अरगडे,गोरक्ष पावबाके,संदीप शिंदे,सागर सोनवणे,सतीश ताजणे,विशाल ताजणे,ज्ञानदेव गाडेकर,नितीन घुगे हे प्रयत्नशील आहेत.
