चिंचपुरच्या सरपंचपदी आ.थोरात गटाचे रामनाथ तांबे यांची निवड

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर आ थोरात यांचे वर्चस्व असून . तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चिंचपूर ग्राम पंचायत मध्ये रामनाथ सहादू पा तांबे यांची नुकतीच सरपंच म्हणून निवड झाली आहे.

चिंचपूर ग्रामस्थांच्या वतीने रामनाथ सहादू पा तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर खेमनर, राजेंद्र चकोर, शिवाजी तांबे, रामगोपीनाथ तांबे, यादव वर्पे , मीना थेटे,  सोनाली गवारे, सविता अनर्थे, राजू लव्हारे , कैलास अनर्थे, उपसरपंच भगत बर्डे , बाबासाहेब तांबे , सागर तांबे, विलास तांबे ,ज्ञानदेव अनर्थे, भागवत गुंजाळ, लक्ष्मण तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र चकोर म्हणाले की,  आ. थोरात यांच्या आदर्श नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात कायम सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जात आहे. सर्व ग्रामपंचायत मध्ये झालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या एकीचा व विकास कामांचा आहे. या निवडणुकीत  बाह्य शक्तींनी मोठ्या दबावाचा  व इतर गोष्टींचा खूप वापर केला .मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही. यापुढेही सर्वांनी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

रामनाथ सहादू पा तांबे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब  थोरात, मा . आ. डॉ सुधीर तांबे, आ सत्यजित तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन करून शुबेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!