बियाणे खते आणि कीटकनाशके बोगस नसेल तर दुरुस्ती कायद्याला का घाबरतात – वसंत मुंडे

मुंबई / लोकवेध live न्यूज 

महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधी कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते दुकानदारा मार्फत शेतकऱ्यांना विक्री करून सोनेरी टोळक्याने धुमाकूळ घातलेला आसुन यास कृषी आयुक्तलय ते तालुका गुण नियंत्रक विभागापर्यंतचे जबाबदार अधिकारी,कर्मचारी आहेत या सर्व बाबींची नोंद करून दुरुस्त कायदा करताना कडक शिक्षेची तरतूद करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडें नी केली. पेरणीच्या अगोदरच बाजारपेठेमध्ये पर राज्यातून सदोष व निकृष्ट बोगस बियाणे खते कीटकनाशके अनेक कंपनीकडून कृषीच्या दुकानदारापर्यंत कशी येतात या जबाबदार कोण आहे. शेतीमालाला भाव नाही, निसर्गाची साथ नाही आणि दुबार पेरणीची संकट शेतकऱ्याच्या समोर उभे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, कारण कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या विक्रेते दुकानदार व अधिकारी यांच्या सहकार्याने बोगस बियाणे खते कीटकनाशके काळया बाजारात भेसळ करून बनावट माल विकून शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या हातबल करून जीवनातून संपून टाकतात व स्वतः उत्पादक कंपन्या व विक्रेते दुकानदार व अधिकारी राजकीय सहकार्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.
महाराष्ट्र राज्यात जिल्हा निहाय ग्रेड निहाय लागणारे स्टेट फर्टीलायझर मिश्र खते संयुक्त खते सूक्ष्म मूलद्रव्य बायो फर्टीलायझर इत्यादी सर्व खते पीजिआर सहित कंपनी निहाय लॉट व बॅच निहाय पुरवठा जिल्हा निहाय व वर्षी निहाय झालेला पुरवठाची माहिती ठेवली पाहिजे. एकही कंपनीकडे स्वतःचे बियाणे उत्पादन केले जात नाही, बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या बियाण्यासाठी माल खरेदी करून त्या वर प्रक्रिया करून प्रमाणित व अप्रमानीत प्रयोग शाळेमधील निकष लावून गुण नियंत्रक विभागामार्फत प्रमाणित मालाची मंजूरी घेऊन एजन्सी मार्फत तयार झालेला माल विकण्यासाठी विक्रेता दुकानदाराकडे कंपन्या पाठवतात. विक्रेते लेबल क्लेम नसलेले पीक वाढ उत्तेजक टॉनिक कीटकनाशके सोबत गरज नसताना शेतकऱ्यांना वाढीव किमतीत विकतात. कंपनी वाले दुकानदारा मार्फत शेतकऱ्यांना सूक्ष्म मूलद्रव्ये गंधक दुय्यम खते दिशाभूल करून शेतकऱ्यांना विकतात , त्यामुळे शेतकरी अज्ञानी असल्यामुळे गैरफायदा घेऊन खाजगी व शेतकरी उत्पादक कंपन्या विविध प्रकारच्या बॅगमध्ये माल घालून बाजारभावाच्या दुप्पट किमतीने विक्रेता दुकानदाराकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट करीत आहेत यावर शासनाचे नियंत्रण नाही. विक्रेत्यांचे माफदा कडून तीन दिवसाचे आंदोलन केले त्यामध्ये वेगवेगळी शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले परंतु निविष्ठा विक्रेता उत्पादक कंपनीकडून विक्रेत्यांना सीलबंद तसेच पॅकिंग केलेला कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत दोषी धरण्यात येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे . नियम व जाचक अटी च्या निषेधार्थ विक्रेत्यांनी शासनाचा निषेध नोंदवला आहे. या सर्व बाबीची शासन स्तरावर खरे उत्पादक कंपन्या व विक्रेत्या मार्फत शेतकऱ्याला जो माल पुरवला जातो आणि निकृष्ट दर्जाचा मालास जबाबदार कोण आहे . त्यांच्यासाठी कडक कायदा करणे काळाची गरज आहे. शासनाच्या महाबीज कंपनीचे नवीन बियाणे न देता , शासनाच्या जास्त मर्जीत असलेल्या खाजगी कंपनीकडून बियाणे शेतकऱ्याला विकत घ्यावे लागते. उत्पादक कंपन्या व विक्रेत्याचे कृषी विभागाचे अधिकाऱ्या बरोबर संगणमत असल्यामुळे बाजारपेठेमध्ये बोगस खते बियाणे कीटकनाशके पीक वाढ उत्तेजक टॉनिक शेतकऱ्यांच्या माथी मारून आर्थिक लूट करून शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ चालू असून निकृष्ट सदोष बियाणे कीटकनाशके औषधी संदर्भात जबाबदार अधिकारी उत्पादक कंपनी व विक्रेते संदर्भात कडक कायदा करून शेतकऱ्याला सदोष निकृष्ट माल पुरवल्यास व ते नियमाप्रमाणे शेतीमध्ये उगवण न झाल्यास शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाई करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!