घारगाव पोलीस स्टेशनला पो. नि.संतोष खेडकर यांची धडाकेबाज एन्ट्री .
एंट्री करताच गुन्हेगरांची पळती भुई थो डी.कारवाईचा बडगा.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ४६ गावे तसेच वाड्या वस्त्यांचा मोठा परिसर आहे.गेली तीन ते चार वर्षापासून गुन्हेगारी बळावली होती. पठार भाग अतिसंवेदनशील बनत चालला असताना यात अनेक चोर्या ,दरोडे, राजकीय गुन्हे, यामुळे हे पोलीस स्टेशन चर्चेत आले होते. पठार भागातील वाढते गुन्ह्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. विद्युत पंपाच्या वाढत्या चोर्या यांमुळे शेतकरी देखील हैराण झालेले होते. अशातच नियुक्त झालेले नवीन पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी धडाकेबाज एन्ट्री मारत कारवाईचा बडगा उगारला असून यात काही सराईत दरोडेखोर,चंदन तस्कर जेरबंद केल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.
