कनोलीत श्री भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

आज बुधवार दिनांक ६डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सिताराम पाटील वर्पे प्राचार्य के.एम वर्पे सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय वर्पे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात व सूत्रसंचालन श्री. खरात सर यांनी केले विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणातून महामानवाला मानवंदना दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम पाटील वर्पे यांनी सुद्धा बाबासाहेबांचे गोड शब्दांमध्ये कौतुक केले चित्रकला शिक्षक दिघे सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!