आ. थोरात यांचे गोरगरीब व कामगारांच्या विकासासाठी मोठे योगदान – सुनील शिंदे
भाजप हा कामगार व गोरगरीब विरोधी

कामगार जोडो अभियानाचा शुभारंभ

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

काँग्रेसने कायम कामगार, शेतकरी व गोरगरीब यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत . मात्र सध्या सत्तेवर असलेला भाजपा हा कामगार, गोरगरीब विरोधी धोरण राबवत आहे. याला संघटितपणे उत्तर देणे गरजेचे आहे .काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम गोरगरीब ,कामगार व सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्याने काम करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांनी काढले आहे.

शेतकी संघ येथे संगमनेर तालुका असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने कामगार जोडो अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे हे होते. तर व्यासपीठावर जि प सदस्य अजय फटांगरे, राज्य सरचिटणीस राहुल वंजारी, तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे, प्रा. बाबा खरात ,अनिल सोमनी, पी. वाय, दिघे ,नामदेव कहांडळ आदींसह जनसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी बोलताना सुनील शिंदे म्हणाले की, काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे. 1952 मध्ये जगामध्ये पहिला कामगार विमा योजना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतामध्ये सुरू केला. काँग्रेसने कायम कामगार हिताचेच निर्णय घेतले आहे. मात्र सध्या सत्तेवर आलेला भाजप हा पक्ष देशात आणि राज्यात कामगार विरोधी काळे कायदे लावू पाहत आहे.

कामगार कायदे लागू नसलेली असंघटित कामगार राज्यात मोठ्या संख्येने आहे .यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठे काम झाले आहे.

आमदार थोरात हे गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा विकास करणारे जनाधार असलेले राज्याचे सुसंस्कृत नेते आहेत. कोविड काळामध्ये जे मजूर स्थलांतरित होत होते यावरून राज्यातील असंघटित कामगारांची संख्या किती मोठी आहे व त्यांची हलत लक्षात येते .या सर्वांसाठी काम करणे गरजेचे असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले की विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात असंघटित कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.  गोरगरिबांना मदत मिळवून देण्यासाठी यशोधन च्या माध्यमातून सातत्याने काम होत आहे. मात्र सध्या सत्तेचा गैरवापर करून काही लोक अधिकाऱ्यांवर दडपशाही करत आहेत. खोटे गुन्हे नोंदवले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून गोरगरिबांवर अन्याय करणारे असल्याचेही ते म्हणाले..

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले तर तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे यांनी आभार मानले

या कामगारांना लाभ मिळेल

असंघटित काँग्रेस कडून विविध योजनांसाठी सातत्याने लाभ मिळवून दिला जात असून या अंतर्गत ई श्रम नोंदणी, बांधकाम कामगार, माथाडी कामगार ,सुरक्षा रक्षक कामगार, घरेलू कामगार, हातगाडीवर फिरणारे, चालक-मालक ,रिक्षा चालक-मालक, ओला, उबर, झोमॅटो , हॉटेलमध्ये काम करणारे कामगार ,ट्रक, टेम्पो चालक-मालक यांची नोंदणी करून यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो यासाठी यशोधन कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!