षटकार चौकाराची क्रीडाप्रेमींना मेजवानी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
याबाबत माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. हे या स्पर्धेचे 25 वर्ष आहे.उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग,आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन , आयपीएल व राज्य पातळीवरील क्रिकेटपटूंचा सहभाग,प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
2023 24 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून तालुक्यात व राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे होत असून या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे भव्य राज्यस्तरीय सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 2,01,000/- ( दोन लाख एक हजार रुपये) र, द्वितीय क्रमांकास 1 लाख 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकास रु 71 हजार रुपये, चतुर्थ बक्षीस 31 हजार रुपये असुन इतरही वैयक्तीक बक्षीसांचा समावेश असणार आहे. यावर्षी ही स्पर्धा अधिक दर्जेदार करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन एक जानेवारी रोजी विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात , मा आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे यांचासह विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे .
या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान 10000 प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असते.प्रत्येक सामना हा दर्जेदार व रंगत होत असतो. यापुर्वी या सामन्यांसाठी बी.सी.सी. आयचे उपाध्यक्ष खा.राजीवजी शुक्ला, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी शिर्के ,सिने अभिनेत्री महिमा चौधरी,अमृता खानवीलकर , प्रणव धनवडे तसेच इतरही अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.
यावर्षी ही स्पर्धा अधिक आकर्षक होणार असून सिने सृष्टीतील अनेक कलावंत व भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज क्रिकेटपटू यांची उपस्थिती लाभणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात. भारतीय संघातील सलील अंकोला, अजित आगरकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे यांनी त्यांची कामगिरी या स्पर्धेत दाखविली आहे. तसेच आयपीएल ,रणजी खेळाडूसुद्धा या स्पर्धेत आपली कामगिरी दाखवत असतात.
तरी ज्या संघांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 21 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी.
सहकारमहर्षी चषक स्पर्धेमध्ये निवडक 32 संघानांच प्रवेश दिला जाणार असून 1 जानेवारी 2024 पासून संगमनेर मधील क्रिडा प्रेमींना चौकारा षटकारांच्या आतिषबाजीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
तरी या या क्रिकेटच्या स्पर्धेत जास्तीत – जास्त संघानी सहभाग घ्यावा व या टी ट्वेंटी स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे
