कित्येक वर्षाच्या तपानंतर निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी अखेर निमगाव जाळी परिसरात दाखल
निमगाव जाळी / लोकवेध live न्युज / अशोक गोसावी
कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी अखेर निमगाव जाळी ता. संगमनेर परिसरात आज रोजी दाखल झाले. पिढ्यान पिढ्या निळवंडे धरणाचा चाललेला हा पाण्याचा संघर्ष गावासाठी आज एक सोनेरी क्षण घेऊन आला या निमित्ताने इतिहासात हा क्षण आज रेखाटला गेला.या आनंद प्रित्यर्थ निमगाव जाळी ग्रामस्थांच्या वतीने पाण्याचे जलपूजन वाद्याच्या गजरामध्ये करण्यात आले.सर्व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाने या पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब,लोकनियुक्त सरपंच प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.पोलीस पाटील दिलीप डेंगळे, सोमनाथ बाळासाहेब जोंधळे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तळोले, पत्रकार अशोक गोसावी, काकासाहेब तळोले, अशोकराव जोंधळे,तानाजी जोंधळे मोहन वदक, विनायक टिळेकरआदी बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर होते
