ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत कार्यक्षेत्रातील ऊस वाढीकरिता कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 1 नोव्हेंबर 2023 नंतर ऊस लागवड खोडवा निडवा पीक घेण्यासाठी अमृत शक्ती हे दाणेदार सेंद्रिय खत 50 टक्के अनुदानावर वसुलीच्या अटीवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
शेतीमध्ये सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. त्याकरता सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आवश्यक असून यासाठी राजहंस व अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे खते ऊस उत्पादकांना 50 टक्के अनुदानावर प्रति एकरी 1 मेट्रिक टन देण्यात येणार आहे.
याचबरोबर 2023- 24 या हंगामातील लागवडीचा ऊस तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी उसाचा शास्त्रोक्त पद्धतीने खोडवा निडवा ठेवणे गरजेचे आहे. याकरता कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले जात आहे.
याबाबतच्या अधिक माहिती करता ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या कृषी विभाग किंवा गट ऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, व्हाईस चेअरमन संतोष हासे व सर्व संचालक मंडळ, व शेतकी विभागाने केले आहे.
