सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांची ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज  व बिरोबा महाराज  सप्ताहास सदिच्छा भेट  
 संगमनेर / लोकवेध live न्युज 
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथे सुरू असलेल्या ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज  व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहास  सरला बेटाचे  मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी भेट दिली  यावेळी सप्ताहतील भाविकांमध्ये चैतन्याचे मंगलमय वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी दत्तगिरी महाराज व सप्ताह कमिटीचे मनापासून भरभरून कौतुक केले त्यांनी आलेले भाविकांना प्रबोधन पर प्रवचन केले
प्रसंगी प्रवचनात बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की हा सप्ताह यापुढेही असाच अखंडपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व दत्तगिरी महाराजांच्या आधिपत्याखाली चालू राहावा.आजच्या वरवंडीतील ह्या सप्ताहाचा प्रारंभ अत्यंत भव्य व खूप चांगला झाला आहे.या सप्ताहसाठी
गावातील प्रत्येक माणूस तन्मयतेने सहभागी झाला आहे यावेळी चांगल्या प्रतीची व्यवस्था गावकऱ्यांकडून झाल्याने त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले पुढे ते म्हणाले की ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांचे वरवंडी या गावावर अतिशय प्रेम होते म्हणून त्यांनी इथेच समाधी घेतली आणि  त्यांची समाधी इथे असल्यामुळे वरवंडी चाळीसक्रोशीत या फिरत्या नारळी सप्ताहास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय याचा आम्हाला अत्यानंद होत आहे.मठाधिपती दत्तगिरी महाराजांच्या मार्गदर्शानाखाली गावातील तरुणांनी व महिलांनी या सप्ताहासाठी खूप मेहनत घेऊन चांगली तयारी केली आहे.मला या फिरत्या नारळी सप्ताहाचा मनस्वी आनंद होत आहे यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!