श्रीक्षेत्र नारायणपूर येथे भव्य दिव्य दत्तजन्म व जयंती सोहळा

 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडणार

 23 डिसेंबर रोजी जवळेकडलग येथील 200 भाविक पायी ज्योत घेऊन जाणार 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

प.पू. श्री.श्री.श्री. श्री सद्‌गुरु नारायण महाराज (अण्णा) यांचे आशीर्वादाने, उपस्थितीत व मार्गदर्शनाने प. पु. श्री टेम्भे स्वामी श्री क्षत्रे नारायणपूर ता. पुरंदर, जिल्हा पुणे येथे रविवार ता. 24/12/2023 ते ता.26/12 2023 तिन दिवसांचा भव्य दिव्य दत्त जयंती सोहळा संपन्न होणार आहे रविवार दि. 24/12 रोजी 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञ सोहळ्याला 23वा वर्धापन दिवस सायंकाळी ४ ते 8.30 ह्या वेळेत होणार आहे. सोमवार ता 25/12/2023 रोजी सायंकाळी ७.०३ मि. श्री दत्तजन्म सोहळा होणार आहे. रात्री ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे किर्तन तसेच रात्री 12 ते 3 भजनी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. ता. २६/१2/2023 रोजी पहाट ४ ते 6 रुद्र7 ते 8 होमहवन 9 ते १० आरती ‘नंतर मंदीरा तून पालखी प्रस्यान होऊन ग्राम प्रदक्षिणा हत्ती घोडे, उंट ढोल लेझीम, लाठी काठी सह मीरवणूक 1.30  वाजता मंदिरात येणार आहे प.पू. सद्गुरू चे आशीर्वाद होऊन आरती महाप्रसाद  होईल तरी लाखोच्या संख्येने भाविकांनी यावे असे आवाहन, दत्तसेवेकेरी करत आहे.
दत्त जयंतीच्या निमीत्ताने जवळ कडलग ता.संगमनेर श्री ज्ञानदेव माऊली देशमुख यांचा वस्तीवरून भव्य मोफत पायी ज्योत सोहळा निघणार आहे.तालुक्यातून 150 ते 200 तरुण भाविक भव्य ज्योत  घेऊन रविवार रोजी 23/12/2023 सकाळी प्रस्थान करणार आहेत. हा ज्योत सोहळा 2 मुक्काम करून 2.5 दिवसात 200 की. मी. अंतर पार करून नारायणपूरला 25/12/2023 रोजी दुपारी पोहचेल. हा पायी ज्योत सोहळा संपूर्ण मोफत असून घरी सुखरूप सोडवण्यापर्यंत आयोजक काळजी घेत असतात.तरी तरुणांनी या ज्योती साठी रविंद्र ज्ञानदेव देशमुख 7020577726 यांचेशी संपर्क साधावा.

सोमवार दि 25/12/2023 रोजी सकाळी 7 वाजता गाव तेथे एसटी चे नियोजन संगमनेर आगार प्रमुख श्री गुंड साहेब व अकोले आगारा चे प्रमुखनी केले आहे
गावातील 40 ते 50 प्रवासी यादी करून आगार प्रमुखकडे दिली असता गावात बस येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!