येत्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगामी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच
शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबन नाना घोलप यांची गर्जना
संगमनेर / अण्णासाहेब काळे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील शिवगर्जना अभियानास सुरुवात करण्यात आली सदर अभियाना निमित्त संगमनेर व्यापारीहॉल संगमनेर येथे मेळावा आयोजित करण्यात आला
सदर मेळाव्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संगमनेर ,अकोले तालुक्यातील शिवसैनिक, गटप्रमुख, गण प्रमुख ,विभाग प्रमुख शाखाप्रमुख व मुख्य पदाधिकारी उपस्थित या मेळाव्यास मार्गदर्शन करताना शिवसेना संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी शिवगर्जना केली व आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार होईल आणि तो मीच होणार, मी असेल किंवा नसेल पण खासदार आपलाच असेल तोपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल अशी गर्जना केली
व उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना उपनेते विनोदजी घोसाळकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आता फक्त लढायचं नाही तर जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं आता लढायचं पण आणि जिंकायचं पण अशी गर्जना करून उपस्थित शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी शिवसेना उपनेते विनोद जी कदम साहेब माजी खासदार सुभाष जी वानखेडे साहेब शिरोळचे माजी आमदार उल्हास जी पाटील साहेब युवा सेनेचे दुर्गे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नागपूर संपर्कप्रमुख नरेश जी माळवे यांनी केले सूत्रसंचालन शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर कतरी यांनी केले तर उपस्थित सर्व शिवसैनिकांचे आभार व मार्गदर्शक सूचना नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी केले यावेळी अकोले व संगमनेर तालुक्यातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना ताई मोरे उत्तर नगर जिल्हा प्रमुख कोपरगाव विभाग प्रमोद जि लबडे साहेब उपजिल्हाप्रमुख महेश नवले व भाऊसाहेब हासे संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख, संजयजी फड पठार भाग तालुकाप्रमुख, अमित चव्हाण युवा सेना जिल्हाप्रमुख ,रावसाहेब गुंजाळ ज्येष्ठ शिवसैनिक ,डॉक्टर मनोज मोरे अकोले तालुकाप्रमुख, संतोष जी मुर्तडक, अकोले पश्चिम भाग तालुकाप्रमुख ,नितीनजी नाईकवाडी अकोले शहर प्रमुख ,तसेच तिटमे ,फापाळे, चौधरी, हासे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संगमनेर येथील महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे ,आशा केदारी, संगीता गायकवाड ,सुरेखा गुंजाळ ,युवा सेनेचे शहर प्रमुख अमोल डुकरे, तालुकाप्रमुख राजू गायकवाड, पठार भाग प्रमुख योगेश खेमनर, जना नागरे लक्ष्मण सोन्नर ,एकनाथ खेमनर, व उपतालुकाप्रमुख अमित फटांगरे, रंगनाथ फटांगरे ,उत्तमराव ढेरंगे, विजू सातपुते उपशहर प्रमुख विकास डमाळे, इम्तियाझ शेख, दीपक वन्नम ,वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, असिफ तांबोळी ,युवा सेनेचे अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे, विजय भागवत,भीमा अनाप अजिज मोमीन ,शोएब शेख युवा सेनेचे अक्षय बिलाडे,प्रकाश क्षत्रिय माधव फुलमाळी अनिल माळी प्रशांत खजुरे शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते
