अहमदनगर :     लोकवेध  live न्यूज 

                                 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची विचारसरणी ही माओवादी असल्याचे वक्तव्य भाजप नेते रविशंकर यांनी केले होते. यावर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपला जर गांधी यांचे विचार माओवादी वाटत असले तर ही त्यांची चूक आहे,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.

नगर येथे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते .यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.आ बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की , ‘ काँग्रेस हा विचार आहे, राहुलजी काँग्रेसच्या विचाराने काम करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते तीन हजार पाचशे साठ किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे. हा पायी प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यांनी सर्व देशाला जोडले आहे. बेरोजगारी, महागाई यावर त्यांनी आवाज उठवला, भाजपला हे विचार माओवादी वाटत असेल तर ही त्यांची चूक आहे,’ अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.नुकतेच मंत्री केसरकर यांनी काँग्रेसवर  टीका केली होती. त्याबाबत  विचारल्यावर थोरात म्हणाले, ‘केसरकर आता नव्याने प्रवक्ते झाले आहेत. ते वाटेल तसे बोलतात,’ असा टोलाही त्यांनी लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!