टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी मेजवानी -सत्यजित तांबे
राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात शुभारंभ
संगमनेर / लोकवेध live न्यूज

क्रीडा क्षेत्रामध्ये ही युवकांना करिअरच्या अनेक संधी आहेत. अनेक राज्य पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रीडा प्रेमींची मोठी उपस्थिती ,दर्जेदार आयोजन आणि उत्कृष्ट मैदान हे वैशिष्ट्य असलेली संगमनेरची सहकार महर्षी टी -20 क्रिकेट स्पर्धा ही राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोदगार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे असून या स्पर्धेचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकार महर्षी टी -20 क्रिकेट स्पर्धेच्या 24 व्या वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, गिरीश मालपाणी, कैलास सोमानी ,रामहरी कातोरे ,गगन थोरात, राणी प्रसाद मुंदडा ,राजेंद्र काजळे ,सरोदे बँकेचे मॅनेजर वनम , सुधाकर जोशी, सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, डॉ मैथिलीताई तांबे, निखिल पापडेजा, असिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे, अंबादास आडेप ,गौरव डोंगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. याचबरोबर यश अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होते मैदानी खेळ हे आरोग्याची गुरुकिल्ली असून प्रत्येक युवकाने एक छंद जोपासण्या बरोबर एक मैदानी खेळ खेळलाच पाहिजे. खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी असून संगमनेरचा अजिंक्य रहाणे आज देश पातळीवर नेतृत्व करत आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक युवक व युवतीने विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर संगमनेरचे नाव उंचावले आहे. आ.सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगले मैदान करून ही स्पर्धा राष्ट्रीय ठरावी असे आयोजन या ठिकाणी होत असल्याने राज्याबाहेरचेही अनेक खेळाडू संगमनेर मध्ये खेळण्यासाठी येतात हे आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले
तर मा आमदार डॉ तांबे म्हणाले की नामवंत खेळाडूंचा सहभाग आणि अटीतटीच्या लढती यामुळे सतरा दिवस संगमनेर मधील क्रिकेट प्रेमींना मोठी मेजवानी मिळणार आहे.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, 2024 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. युवक व क्रीडा प्रेमींसाठी मोठी संधी आहे .यावेळी गिरीश मालपाणी, सौ दुर्गाताई तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी प्रशांत गुंजाळ, गिरीश गोरे, ॲड .सुहास आहेर, शेखर सोसे, हैदर अली, नितीन अभंग, कमलेश उनवणे, श्रेयस कर्पे, विजय गोदावंत, शैलेश कलंत्री, सुमित पानसरे, एकनाथ श्रीपाद, अक्षय दिघे, जयेश जोशी, जयंत अभंग आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप लोहे यांनी केले. यावेळी संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
हिरवळीसह उत्कृष्ट नियोजनाने सजले क्रीडा संकुल
संगमनेरची टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ही उत्कृष्ट आयोजनाने लौकिकास्पद ठरली आहे. यामध्ये संपूर्ण मैदानावर हिरवळ, व्हीआयपी बैठक व्यवस्था, 10000 नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी ,संगीत वाद्य ,आकर्षक सजावट ,ऑनलाइन प्रक्षेपण, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था या सुसज्ज तयारीमुळे ही स्पर्धा आकर्षक ठरत आहे .या स्पर्धेत अजिंक्य रहाणे सह विविध राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू यावेळी सहभागी होणार आहेत.
