गगनगिरी विद्यालयात जिल्हास्तरीय गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय पिंपरणे व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे.
स्पर्धांचे उद्घाटन संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष विलास साळवे सर,माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार सर,साहित्य परिषदेच्या सदस्य शोभाताई बाप्ते,प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे,श्री दीपक क्षत्रिय, श्री ज्ञानेश्वर राक्षे, श्री निलेश पर्वत, श्री संतोष पवार, श्री नंदकुमार बेल्हेकर ,डॉक्टर मोटेगावकर, श्री सुरेश म्हाळस, श्री विजय दीक्षित, श्री.मुकुंद डांगे, श्री गिरीश सोमानी, श्री.सुभाष औटी प्राचार्य डी आर सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. परिषदेचे सदस्य श्री बाळकृष्ण महाजन यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून परिषदे मार्फत काम पाहिले.
या स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आल्या. इयत्ता तिसरी चौथी,इयत्ता पाचवी ते सातवी,इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी बारावी असे हे गट होते.
शेवगाव, पारनेर, श्रीरामपूर,राहुरी, अकोले, कोपरगाव ,नाशिक सह संगमनेर तालुक्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व गट मिळून एकूण 86 विविध विद्यालय संस्थांमधील165 स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपली भाषणे या स्पर्धेत सादर केली.
आत्मविश्वासाने, ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे केली. भाषणातील माहितीपूर्ण आशयाने,मुद्देसूद मांडणी,स्पष्ट शुद्ध शब्दोचाराने उपस्थित श्रोत्यांची मने या विद्यार्थ्यांनी जिंकली.
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्पर्धा संयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
स्पर्धेबरोबरच आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मिष्टान्न भोजनाची सोयही करण्यात आली होती. संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांचे चांगले सहकार्य लाभले. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी भरीव आर्थिक योगदान दिले. तसेच यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था व शोभा बाप्ते मॅडम यांचेही योगदान लाभले
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब देशमुख सर्व पदाधिकारी व स्कूल कमिटी सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.
