राज्यघटना व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा- खा. शरद पवार

आश्वी बु येथे खासदार शरद पवार,आ बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला असून त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले आहे.

आश्वी बु येथे  शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर मा. आ डॉ सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे ,आमदार सत्यजित तांबे, मा आ प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण पा. कडू, सौ दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, सौ वैशालीताई गायकवाड ,सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते .त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून  भारताला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हाच वारसा घेऊन बाळासाहेब गायकवाड यांनी काम केले असून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी जन माणसांची कामे केली आहेत . सातत्याने लोकांमध्ये राहण्याबरोबर कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही. संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

तर आ थोरात म्हणाले की, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे .राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे .सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषी मंत्री पदाच्या काळात सहा वर्ष पवार साहेबांबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले. राज्यातील प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असलेले नेतृत्व खा. शरदचंद्रजी पवार असून त्यांनी आज अश्वितील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गौरव केला आहे. बाळासाहेब गायकवाड यांनी कायम पुरोगामी विचार जपला असून समाजात तेढ निर्माण होऊ दिली नाही. चांगले काम केल्यामुळे या परिसरामध्ये खोट्या केसेस दाखल करण्याचे सत्र सुरू झाले असून अशा संकट काळात बाळासाहेब गायकवाड हा नेहमी सत्यतेच्या बाजूने उभे राहिले असल्याचेही ते म्हणाले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की पवार साहेबांनी देशभरात जमवलेली कार्यकर्त्यांची फळी हीच मोठी संपत्ती आहे
तर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या न्यायालयात मवीआ सरकारलाच बहुमत मिळणार असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, जातीयवादी आणि धर्मांध शक्तीचा विचार रोखण्यासाठी आता संविधान वाचवणाऱ्या विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा.यावेळी अशोक गायकवाड ,रावसाहेब म्हस्के, श्रीकांत भालेराव यांचीही भाषणे झाली

यावेळी नवनाथ आंधळे, बबनराव शिंदे, संतोष ताजणे, आनंद गायकवाड सौ अरुणा हिंगे, सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कार्यकर्ते विजय हिंगे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर राहुल ज-हाड यांनी आभार मानले .यावेळी आश्वी पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

खा पवारांनी ज्यांना मोठे केले ते पळाले- बाळासाहेब गायकवाड

खासदार शरदचंद्र पवार यांनी अनेकांना मोठमोठे पदे दिली. मात्र ते पळून गेले .मात्र पवार साहेब भक्कमपणे उभे आहेत 83 वर्षाचा योद्धा लढतो आहे आणि तुम्ही ईडीला घाबरून घाबरून पळत आहात अशी टीका करताना आपण कायम पुरोगामी विचार जपला असून यापुढील काळात खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात नेतृत्वाखाली काम करणार असून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पूर्ण समाजाची ताकद एकत्र करू असे सांगताना  याचबरोबर देहदान करणार असल्याची घोषणा करत ते पत्र खासदार शरद पवार यांच्या हस्ते डॉ तांबे यांच्याकडे सुपूर्त केले

खासदार पवारांचे आगमन होतात अश्वित जल्लोष

अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांची अशवी मध्ये आगमन होतात फटाक्यांची आतिषबाजी तोफांची सलामी रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी, महिला ,जेष्ठ व युवकांची मोठी गर्दी यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!