डॉ.आंबेडकरांचा बौद्ध विचार जगाला वाचवू शकतो….. आनंदराज आंबेडकर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
धम्मयात्रा -दादासाहेब रुपवते यांचा ९८वा जन्मदिन मुलंगंधकुटी जेतवन ,भंडारदरा ,मान. आनंदराज आंबेडकर व मा.डॉ.धम्मपिया यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.रावसाहेब कसबे,भन्ते नागघोष महाथेरो .मा. वैभव पिचड, मा.अमित भांगरे आणि मा. डॉ.पुष्पा किरण लहामटे ताई, मा.दिलीप भांगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मा.अड संघराज रुपवते यांनी भूषविले.कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष मिलिंदराव सोनवणे यांनी पंचशील ध्वजारोहण करून केली. त्रिशरण -पंचशील ग्रहण भगवान बुद्धांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.म. ज्योतिबा फुले ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई , दादासाहेब रुपवते ,प्रेमानंदजी रूपवते यांना अभिवादन करण्यात आले.जीवक मेडिकल सेंटर द्वारे मोफत मेडिकल सेंटर आणि पुस्तकाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी भव्य धम्म मिरवणूक लेझीम पथक झांज पथक यांचे समवेत स्व.यशवंतरावजी भांगरे यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आली. धम्मसभेची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मा.आनंदराजआंबेडकर व डॉ.धम्मपिया यांच्या हस्ते करण्यात आली..
मुंबई कमिटीचे अध्यक्ष मा.सुरेश डोळस (लहितकर)यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमात मा.आनंदराज आंबेडकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये मा. विठ्ठल खरात,मा. सुरेश सूर्यवंशी ,मा. माधव मिसाळ मा.कुंडलिक लांडगे व मान.ए.एल. गायकवाड यांना धम्मकार्या मध्ये विशेष कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन्मानपत्राचे वाचन विनय घोसाळे, डि.के.जमधडे, वंदन घोसाळे, वैभव वारे, कैलास बड आणि दिपक साबळे यांनी केले.
