रयत संकुल,आश्वी बु”ची श्रेया मुन्तोडे तालुका विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
संगमनेर तालुका विज्ञान प्रदर्शन वृंदावन इंग्लिश मीडियम स्कूल,चंदनापुरी येथे नुकतेच संपन्न झाले या प्रदर्शनात रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल अश्वि बु ची श्रेया अनिल मुन्तोडे संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
श्रेया अनिल मुन्तोडे हिने संगमनेर पंचायत समिती व संगमनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला असून पर्यावरणीय समतोल टिकवण्यासाठी उपयुक्त सीड बॉल्स या विषयातील श्रेयाचे उपकरण तालुक्यातील सर्व उपकरणात अव्वल ठरले. आता आता तिची अहमदनगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात श्रेया ही संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार तिच्या यशाबद्दल संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय तसेच विज्ञान क्षेत्रातील मान्यवराकडून तिचे अभिनंदन होत आहे. नाविण्य,विषयाची योग्य निवड,उत्तम सादरीकरण , उपयुक्तता या बळावर श्रेयाने सदर यश मिळवले असल्याचे प्राचार्य जनार्दन बर्डे यांनी यावेळी सांगितले.
याबाबत तिला तिचे वडील अनिल मुन्तोडे,गणित,विज्ञान विभाग प्रमुख शिला संसारे,भिमा सहाणे पर्यवेक्षक सुनंदा लोखंडे, सुवर्णा वाघचौरे,ज्योती फुलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, उत्तर विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,इनस्पेक्टर,सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी ,शालेय व्यवस्थापन व विकास समिती सदस्य ,विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजू शहाणे,रमेश थेटे,हरिभाऊ कोकाटे,नीता केदार तसेच विद्यालयातील सर्व सेवक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रेयाचे अभिनंदन केले
