थापलिंग क्रिकेट सामन्यात कोल्हार इलेव्हन संघ विजयी
आश्वी / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथे ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्ताने सुरू झालेल्या थापलिंग क्रिकेट क्लबच्या भव्य टेनिस बॉल स्पर्धेची काल सांगता झाली.या स्पर्धेमध्ये ६० संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोल्हार इलेव्हन क्रिकेट संघाने मिळविले.
स्पर्धेची सुरुवात महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते ११ जानेवारीला झाली होती.यामध्ये एकूण चार बक्षीस देण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारा कोल्हार इलेव्हन या संघाने प्रथम पारितोषिक घेतले या संघाचे कर्णधार प्रसाद लोंढे यांनी बक्षीस स्विकारताना अतिशय उत्कृष्ट नियोजन थापलिंग क्रिकेट क्लबच्या आयोजकांनी केले असे सांगून आयोजकाचे आभार मानले त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक वरवंडीच्या स्थापलिंग क्रिकेट क्लबच्या संघाने मिळविले.कोल्हार इलेव्हन आणि थापलिंग या संघामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये अतिशय चुरशीची लढत होऊन द्वितीय बक्षीस मिळविल्या याबद्दल थापलिंग संघाचे कर्णधार आबासाहेब नेहे यांनी बक्षीस स्विकारले व तृतीय पारितोषिक दरडगाव येथील संघाने पटकावले संघाचे कर्णधार लहानू बर्डे त्यांनी बक्षीस स्विकारले चतुर्थ बक्षीस शरणपूर संघाने पटकाविले व संघाचे कर्णधार नवनाथ ढोकळे यांनी ते स्विकारले यावेळी सर्व खेळाडूंनी अतिशय समाधान व्यक्त केले.
