तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कनोली विद्यालयाचा सतरा वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक 
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धेत मा श्री भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयातील १७ वर्षे वयोगटातील मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर
 १४ वर्षे वयोगटातील मुली यांचा द्वितीय क्रमांक( उपविजेते) त्याबद्दल विद्यालयाचे
मार्गदर्शक शिक्षक श्री फापाळे सर,बाबासाहेब वर्पे ,अमजद शेख,राजेंद्र वर्पे,सुभाष वर्पे सर या सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 प्राचार्य, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!